Best Fuel Credit Card Esakal
Banking

पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दराचा खिशाला बसतोय फटका? मग हे Fuel Credit Card वापरून इंधनाच्या खर्चात होईल बचत

Best Fuel Credit Card: बँका किंवा विविध क्रेडिट कार्ड कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी विविध सूट किंवा ऑफर्स असलेले फ्युएल क्रेडिट कार्ड घेऊन येत असतं. या फ्यूएल क्रेडिट कार्डच्या मदतीने तुम्ही इंधनाच्या खर्चामध्ये मोठी बचत करू शकता

Kirti Wadkar

Best Fuel Credit Card: गेल्या काही वर्षांमध्ये पेट्रोल-डिझेल या इंधनांचे दर हे वाढतच चालले आहेत. यामुळे वाहन मालकांच्या खिशाला मोठा फटका बसतोय. इंधनांच्या Fuel वाढत्या किमतींमुळे मात्र सध्या Fuel Credit Card ची मागणी वाढत असल्याचं दिसून येतंय. Know about Fuel Credit Cards and Save Money on petrol and diesel

बँका आणि अनेक फायनान्स कंपन्या वाहनधारकांसाठी फ्यूल क्रेडिट कार्ड घेऊन आले आहेत. जर तुमचा कारचा किंवा तुमच्या वाहनाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो आणि त्यासाठी लागणाऱ्या पेट्रोल किंवा डिझेलच्या Fuel खर्चामुळे तुम्ही कायम चिंतेत राहत असाल तर फ्युएल क्रेडिट कार्ड हा तुमच्यासाठी एक चांगल पर्याय ठरू शकतो.

बँका किंवा विविध क्रेडिट कार्ड कंपन्या Credit Card आपल्या ग्राहकांसाठी विविध सूट किंवा ऑफर्स असलेले फ्युएल क्रेडिट कार्ड घेऊन येत असतं. या फ्यूएल क्रेडिट कार्डच्या मदतीने तुम्ही इंधनाच्या खर्चामध्ये मोठी बचत करू शकता.

वाहनधारकाच्या वापरानुसार फ्यूएल क्रेडिट कार्डवर देखील विविध प्रकारच्या सवलती दिल्या जातात. या मध्ये कॅशबॅक किंवा रिवॉर्ड पॉइंटच्या माध्यामातून वाहनधारकांचा इंधनावरील खर्च कमी होऊ शकतो. अशाच काही फ्यूएल क्रेडिट कार्डची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

IndianOil HDFC Bank Credit Card

इंडियन ऑइल एचडीएफसी बँक क्रेडिट कार्डच्या माध्यमातून IOCL आउटलेटवर 'फ्यूएल पॉइंट्स' नावाचे रिवॉर्ड पॉइंट देतात. जर तुम्ही इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावर पेट्रोल किंवा डिझेल भरल्यानंतर या कार्डच्या माध्यमातून पेमेंट केलं तर तुम्हाला एकूण खर्चाच्या ५ टक्के फ्यूएल पॉइंट्स दिले जातात. हे फ्यूल पॉइंट्स रिडीम करून वाहनधारक वर्षाला साधारण ५० लीटरपर्यंत इंधन भरून घेऊ शकतात.

BPCL SBI Card

एसबीआय बँकेच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या माहितीनुसार बीपीसीएल BPCL पेट्रोल पंपावर इंधन तसचं ल्यूब्रिकंटवर खर्च केल्यास कार्डवर ७.२५ टक्के कॅशबँक देण्यात येतो. तसचं भारत गॅससाठी केलेल्या पेमेंटवर ६.२५ टक्के कॅशबॅक मिळतं.

हे देखिल वाचा-

स्टॅण्डर्ड चार्टर्ड सुपर व्हॅल्यू टायटेनियम क्रेडिट कार्ड

standard chartered Super Value Titanium Credit Card चा वापर करूनही तुम्ही इंधनावर होणारा खर्च कमी करू शकता. या कार्डचा पेट्रोल पंपावर पेमेंट करण्यासाठी वापर केल्यास एकूण खर्चावर ५ टक्के कॅशबॅक मिळतो. मात्र यासाठी तुमचा खर्च हा २००० रुपये किंवा त्याहून कमी असणं गरजेचं आहे.

या कार्डवर देण्यात आलेल्या या कॅशबॅक ऑफरच्या मदतीने तुम्ही महिन्याला २०० रुपयांपर्यत कॅशबॅक मिळवू शकता. एका ट्रान्झॅक्शनमध्ये जास्तीत जास्त १०० रुपये कॅशबॅक मिळतो.

इंडियन ऑइल Citi Credit Card

इंडियन ऑइल सिटी क्रेडिट कार्डचा पेट्रोल डिझेलचं पेमेंट करण्यासाठी वापर केल्यास तुम्हाला वर्षाला जवळपास ६८ लीटर पेट्रोल-डिझेल मोफत मिळू शकतं. फ्यूएल पेमेंट करण्यासाठी Indian Oil Citi Credit Card हा एक उत्तम पर्याय आहे. इंडियन ऑइल पेट्रोल पंपावर या कार्डचा वापर केल्यास तुम्हाला अनेक फायदे मिळतील.

या कार्डवर तुम्हाला रिवॉर्ड पॉइंट मिळतील जे कधीही एक्सपायर होणार नाहीत. इंधन भरण्यासाठी १५० रुपये खर्च केल्यास तुम्हाला ४ टर्बो पाइंट मिळतील. हे पॉइंट रिडीम करून तुम्हाला वर्षाला ६८ लीटर पेट्रोल मोफत मिळेल.

IndianOil Axis Bank Credit Card

इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावर जर तुम्ही या कार्डचा वापर केला तर तुम्हाला १०० रुपयांच्या खर्चावर २० रिवॉर्ड पॉइंट मिळू शकता. हे रिवॉर्ड पॉइंट तुम्ही कधीही रिडीम करू शकता.

अशा प्रकारे तुम्ही विविध क्रेडिट कार्डचा वापर करून इंधनाच्या खर्चामध्ये बचत करू शकता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: शरदचंद्र पवार पक्षाचे विजयी उमेदवार अभिजीत पाटील यांनी जीपवर चढून दंड थोपटत विजय साजरा केला

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT