Ratan Tata Aditi Chetan Walunj Sakal
Business

Business Success Story: रतन टाटांच्या मदतीने सुरू केली कंपनी; आज दर महिन्याला कमावतायत कोट्यवधी रुपये

सुरुवातीच्या दिवसांमध्ये, कंपनीद्वारे त्यांचा नफा दरमहा फक्त 70,000 रुपये होता, आणि आता....

वैष्णवी कारंजकर

स्विगी आणि झोमॅटो सारखी फूड डिलिव्हरी अॅप्स देशातील काही लोकप्रिय प्लॅटफॉर्म आहेत, पण तुम्हाला माहिती आहे का की पेट्रोलसाठीही स्विगी आहे? अदिती आणि चेतन या पती-पत्नीने घरपोच पेट्रोल पोहोचवण्याचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

चेतन वाळुंज आणि अदिती भोसले वाळुंज या पती पत्नीने नाविन्यपूर्ण स्टार्टअप कंपनी रेपोस एनर्जी ही पुणे स्थित फर्म तयार केली जी ६५ भारतीय शहरांमध्ये घरोघरी इंधन वितरणास मदत करण्यासाठी ऑनलाइन पेमेंट आणि इतर स्वरूपांना परवानगी देते.

रेपोस एनर्जीची कल्पना तेव्हा समोर आली, जेव्हा आदितीच्या पालकांनी तिला अरेंज मॅरेज करण्यास सांगितलं. लग्न करण्याची इच्छा नसताना आदिती आणि चेतन भेटले आणि एकमेकांना आवडले. त्यानंतर त्यांनी लग्न केलं. मेकॅनिकल इंजिनीअर असलेल्या चेतनशी लग्न केल्यानंतर आदितीने आपलं अमेरिकेत उच्च शिक्षण घेण्याचं स्वप्न मागे सोडलं. पण दोघांना एका समान ध्येयाने झपाटलं होतं. हे ध्येय म्हणजे स्वतःची स्टार्टअप कंपनी सुरू करण्याचं.

या ध्येयापासूनच ग्राहक आणि कंपन्यांना दारातच पेट्रोल पुरवण्याच्या संकल्पनेतून रेपोस एनर्जीची सुरुवात झाली. त्यांना पेट्रोल पंपांच्या इतकेच मार्जिन मिळत होतं. सुरुवातीच्या दिवसांत कंपनीद्वारे त्यांचा नफा दरमहा ७० हजार रुपये होता.

त्यांच्या या युनिक व्यवसायाने आणि कल्पनेने प्रसिद्ध व्यावसायिक रतन टाटा यांचं लक्ष वेधून घेतलं. तंत्रज्ञान आणि उर्जा स्त्रोतांचा वापर पाहून रतन टाटा यांनी या फर्ममध्ये गुंतवणूक केली, ज्याने लवकरच या कंपनीने गगनाला भिडणारी वाढ पाहिली. त्यांच्या व्यवसायातून केवळ ७०,००० रुपये प्रति महिना कमावण्यापासून, अदिती आणि चेतन यांनी त्यांच्या स्टार्टअप रेपोस एनर्जीद्वारे दरमहा २.२ कोटी रुपये कमावले.

अखेरीस या जोडप्याने गेल्या आर्थिक वर्षात ६५ कोटी रुपयांहून अधिक उलाढाल केली.आज, रेपोस एनर्जीची किंमत २०० कोटींहून अधिक आहे आणि रतन टाटा-समर्थित फर्मने लार्सन अँड टुब्रो, टाटा समूह, महिंद्रा अँड महिंद्रा, शिंडलर, जेडब्ल्यू मॅरियट हॉटेल, फिनिक्स मॉल, वेस्टिन हॉटेल, यांसारख्या मोठ्या कंपन्यांसोबत प्रकल्पांवर स्वाक्षरी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT