हिरो आणि होंडा का झाल्या विभक्त Esakal
Business

Hero आणि Honda या कंपन्या विभक्त का झाल्या? ही आहेत कारणं

ग्राहकांची पसंती, विश्वास जिंकून एवढचं नव्हे तर भारतातील मार्केटचा मोठा हिस्सा प्राप्त करूनही हिरो-होंडा का विभक्त झाल्या, असा सवाल अनेकांना पडला असेल. जाणून घेऊयात या मागची कारणं......

Kirti Wadkar

काही वर्षांपूर्वी एखाद्या सामान्य व्यक्तीसाठी बाईक Bike खरेदी करायची म्हंटलं की सर्वात पहिले नाव समोर यायचं ते म्हणजे हिरो होंडा Hero Honda कंपनीचं. हिरो होंडा कंपनीने देशीतील सामान्य व्यक्तीचं बाईक खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण करत भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये एक क्रांती घडवली. Company Affairs Business News in Marathi know reason for separation in Hero and Honda

चांगली आणि खिशाला परवडणारी बाईक म्हणून हिरो-होंडाच्या बाईक Hero Honda Bike लोकप्रिय ठरल्या. खरं तर सुरुवातीला अनेकांना हिरो होंडा ही एकच कंपनी Company असल्याचं वाटलं.

मात्र हिरो होंडा ही दोन कंपन्यांनी एकत्र येत पार्टनरशिपमध्ये सुरु केलेला ब्रॅण्ड होता. १९८४ साली हिरो आणि होंडा या कंपन्यांनी सामंज्यसाने एक करार करून भागीदारी सुरु केली.

२०१० सालापर्यंत ही भागीदारी Partnership यशस्वीरित्या सुरु राहिली. मात्र त्यानंतर २०१० मध्ये या दोन्ही कंपन्या वेगळ्या झाल्या. होंडाने आपली संपूर्ण भागीदारी विकून टाकली. त्यानंतर दोन्ही कंपन्या स्वतंत्ररित्या ऑपरेट करू लागल्या.

ग्राहकांची पसंती, विश्वास जिंकून एवढचं नव्हे तर भारतातील मार्केटचा मोठा हिस्सा प्राप्त करूनही हिरो-होंडा का विभक्त झाल्या, असा सवाल अनेकांना पडला असेल. नफ्याच्या मोहापायी की कोणत्या इतर कारणांनी या कंपन्यांनी स्वतंत्र ब्रॅण्ड निर्माण केला. यामागे काय कारणं आहेत हे जाणून घेऊयात.

हे देखिल वाचा-

हिरो आणि होंडा या कंपन्यांमध्ये एक करार झाला होता. या करारानुसार हिरो ही भारतीय कंपनी बाईकसाठी बॉडी बनवेल तर होंडा ही जपानी कंपनी इंजिनचा पुरवठा करेल. तसंच भविष्यात दोन्ही कंपन्या एकमेंकाशी स्पर्धा करत आपलं प्रोडक्ट एकाच वेळी लॉन्च करणार नाहीत, असं ठरलं होतं.

हिरो होंडाच्या बाईकला मोठी मागणी होती. यानंतर बजाज, यामाहा, सुजुकी अशा कंपन्यांनी आपल्या बाईक लॉन्च केल्या. स्पर्धा वाढली असली तरी हिरो होंडाला किंमतीत वाढ करायची नव्हती. यासाठी काही काळ कंपनी तोट्यातही होती. १९९० साली डॉलरची एक्श्चेंज प्राइस रेग्युलेट झाल्यानंतर पुन्हा कंपनीला चांगले दिवस आले.

हिरो होंडामध्ये अंतर्गत वाद

असं असलं तरी कंपनीत अंर्तगत पातळीवर काही समस्या सुरू झाल्या होत्या. होंडा कंपनी आपल्या बाईक अमेरिका आणि रशिया सारख्या देशांमध्ये विक्री करत होती. हिरोला मात्र परदेशात बाईक विक्री करण्याची परवानगी नव्हती. एकीकडे हिरो जगातील सर्वात मोठी सायकल उत्पादक कंपनी होती. मात्र तिला विविध देशात बाईक विकण्याची बंदी होती.

भारताबाहेर हिरो होंडा केवळ नेपाळ, भूतान आणि बांग्लादेशमध्ये आपल्या बाईकची विक्री करत असे. एकीकडे होंडा जागतिक पातळीवर विस्तार वाढवत असताना हिरो मात्र बंधनांममध्ये अडकली होती. हिरो कंपनी इंजिनसाठी होंडावर अवलंबून होती. त्यानंतर हिरोने त्यांचा संपूर्ण प्रॉफीट इंजिन तयार करण्यासाठी वापरला. यानंतर हिरो आणि होंडा यांच्यामध्ये फूट वाढू लागली.

होंडाने करार मोडला

एकमेकांच्या स्पर्धेत कधीच बाईक लॉन्च करायची नाही असा करार केला असूनही १९९९ साली होंडाने हा करार मोडला. होंडाने Honda Motercycle and scooter india Pvt Ltd ही कंपनी स्थापन करून सारख्याच किमतीच्या बाईक लॉन्च केल्या. यामुळे हिरो होंडाचे ग्राहक विभागले गेले. तसंच काही वर्षांनी होंडाने स्कुटर सेगमेंटमध्येही प्रवेश केला.

होंडा आपल्या स्वतंत्र कंपनीतून चांगला नफा कमावत होतीच शिवाय हिरो होंडा कंपनीतील नफा देखील होंडा कंपनीला मिळत होताच. दोन्ही कंपनीत स्पर्धा आणि मतभेद वाढत गेले अखेर दोन्ही कंपन्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. २०१० मध्ये या कंपन्या विभक्त झाल्या.

हिरोने नवी कंपनी स्थापन केली

हिरो होंडा कंपनीमध्ये दोन्ही कंपन्यांचे २६-२६ टक्के शेअर्स होते. होडां कंपनीने हिरो कंपनीला त्यांच्या हिश्याचे शेअर विकले. हिरो कंपनीचे प्रमोटर ब्रिजमोहन लाल यांनी १.२ अरब डॉलरमध्ये हे शेअर्स खरेदी केले आणि हिरो मोटोकॉर्प नावाची स्वतंत्र कंपनी स्थापन केली.

विभक्त झाल्यानंतर हिरो आणि होंडा कंपनीने भारतीयांची पसंती कायम राखली आहे. सध्याच्या घडीला हिरो मोटोकॉर्प ही भारतातील सर्वात आघाडीची बाईक कंपनी आहे तर होंडा दुसऱ्या क्रमांकावर आहे.

हे देखिल वाचा-

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT