Disney Layoffs Esakal
Business

Disney Layoffs : डिस्नेच्या २,५०० कर्मचाऱ्यांवर येणार आभाळ; लेऑफचा तिसरा टप्पा जाहीर

Sudesh

गेल्या काही महिन्यांपासून कित्येक मोठमोठ्या कंपन्या हजारो कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवत आहेत. मनोरंजन क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असलेल्या डिस्नेनेही आता तिसऱ्यांदा लेऑफची घोषणा केली आहे. यामुळे जगभरातील २,५०० कर्मचाऱ्यांना नारळ मिळणार असल्याची चर्चा आहे.

डिस्नेचे सीईओ बॉब इगर यांनी फेब्रुवारीमध्ये सुमारे ७,००० कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची योजना (Disney layoffs) जाहीर केली होती. कॉस्ट कटिंग करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला होता. मार्च आणि एप्रिल या महिन्यांत दोन टप्प्यांमध्ये डिस्नेने ४,००० कर्मचाऱ्यांना कमी केले होते. यानंतर आता लेऑफचा तिसरा टप्पा जाहीर करण्यात आला आहे.

यानंतर कामावरून काढून टाकण्यात आलेल्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या ६,५०० होईल. ही संख्या बॉब यांनी सांगितलेल्या ७,००० या आकड्याच्या जवळ जाणारी आहे. त्यामुळेच हा लेऑफचा शेवटचा टप्पा (Disney third round of layoffs) असल्याचं बोललं जातंय. मात्र, डिस्ने अजूनही काही टप्पे जाहीर करू शकतात असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

पार्क आणि रिसॉर्टला धोका नाही

डिस्नेच्या अम्युझमेंट पार्क्स आणि रिसॉर्टमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या लेऑफचा धोका नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. लेऑफच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये डिस्नेच्या टेलिव्हिजन सेक्टरमधील कर्मचाऱ्यांना दणका बसला होता. या टप्प्यामध्ये मात्र टीव्ही सेक्टरमधील अगदी कमी कर्मचाऱ्यांना काढण्यात येणार आहे. या टप्प्यात विशेष अशा कोणत्याही सेक्टरला टार्गेट करण्यात येणार नसल्याचं रिपोर्ट्समध्ये सांगण्यात येत आहे.

५.५ बिलियन डॉलर्सचे लक्ष्य

नोव्हेंबरमध्ये डिस्नेच्या सीईओ पदावर पुन्हा आल्यानंतर इगर यांनी मोठे निर्णय जाहीर केले. कॉस्ट कटिंगच्या माध्यमातून ५.५ बिलियन डॉलर्स वाचवण्याचे आपले लक्ष्य असल्याचे ते म्हणाले होते. यासाठी लेऑफ सोबतच इतरही निर्णय घेण्यात आले. यामुळेच कंपनीने आपल्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवरून कित्येक मूव्हीज तसेच शोज हटवण्यास सुरुवात केली आहे.

स्टारक्रूजर करणार बंद

डिस्नेने आपल्या स्टार वॉर्स फ्रँचायझीच्या चाहत्यांसाठी या चित्रपटावर आधारित थीमचे हॉटेल सुरू केले होते. गॅलेक्टिक स्टारक्रूजर असं या हॉटेलचं नाव होतं. मात्र चाहत्यांचा मिळणारा अत्यल्प प्रतिसाद पाहता, सप्टेंबरमध्ये हे कायमचं बंद करण्याचा निर्णय डिस्नेने घेतला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

में यूपी से हू; मराठी नही आती...! मुंबई मेट्रोवनमधील कर्मचाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल, मराठी एकीकरण समितीकडून करेक्ट कार्यक्रम

Ranji Trophy 2024: साई सुदर्शनचे द्विशतक, Ishan kishan चे शतक, तर वॉशिंग्टन सुंदरची तुफान फटकेबाजी

आणि त्याने लगेच पाण्यात उडी मारली... 'राजा राणी'च्या सेटवर सुरज चव्हाणने वाचवला एकाचा जीव

Worli Assembly Constituency: वरळीत तिरंगी लढतीची शक्यता, आदित्य ठाकरेंचं टेन्शन वाढणार!

Latest Maharashtra News Updates : सायन-पनवेल उड्डाणपुलाखाली उभारणार स्वच्छतागृहे

SCROLL FOR NEXT