Part time business ideas for women Esakal
Business

महिलांसाठी Part Time Business आयडिया... पैसा आणि शिक्षण कमी असेल तरी पैसा कमावणं शक्य

Part time business ideas for women: बिझनेस किंवा व्यवसाय करायचा म्हटलं तर भांडवल हवं. अनेक महिलांपुढे भांडवल हा देखील एक मोठा प्रश्न असतो. मात्र आम्ही तुम्हाला अगदी कमी भांडवल गुंतवून सुरु होणारे व्यवसाय तसंच भांडवल उभं करण्यासाठीचे पर्यायही सांगणार आहोत

Kirti Wadkar

Part time business ideas for women: सध्याच्या युगामध्ये महिला Women या प्रत्येत क्षेत्रामध्ये पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. घर, कुटुंब आणि मुलं यांची जबाबदारी सांभाळत असतानाच नोकरी किंवा व्यवसाय Business करण्याची जिद्द आणि बळ महिलांच्या अंगी पाहायला मिळते. Part Time Business Tips for women and housewives

स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठी अनेक मुली किंवा महिला धडपड करताना दिसतात. मात्र अनेकदा कमी शिक्षण Education किंवा कुटुंबाचा आणि मुलांचा भार किंवा इतर अनेक कारणांमुळे महिलाना नोकरी किंवा व्यवसायासाठी Business पुरेसा वेळ देता येत नाही. अशा वेळी एखादा पार्ट टाइम बिझनेस हा चांगला पर्याय ठरू शकतो.

पार्ट टाइम बिझनेस Part Time Business करायचा म्हटलं तर नेमका कोणता बिझनेस करावा आणि कसा करावा हा अनेक महिलांना प्रश्न पडत असेल. यासाठी आम्ही तुम्हाला काही बिझनेस आइडिया सांगणार आहोत. हे बिझनेस तुम्ही तुमच्या सोयीनुसार करू शकता. शिवाय कालांतराने ते वाढवत नेऊन तुम्ही तुमचं उत्पन्न वाढवू शकता.

बिझनेस किंवा व्यवसाय करायचा म्हटलं तर भांडवल हवं. अनेक महिलांपुढे भांडवल हा देखील एक मोठा प्रश्न असतो. मात्र आम्ही तुम्हाला अगदी कमी भांडवल गुंतवून सुरु होणारे व्यवसाय तसंच भांडवल उभं करण्यासाठीचे पर्यायही सांगणार आहोत.

हे देखिल वाचा-

Youtube Channel – सध्याच्या घडीला अत्यंत ट्रेंडमध्ये असलेला हा व्यवसाय म्हणता येईल. कमी शिक्षण किंवा कोणत्याही भांडवलाशिवाय महिला यूट्यूब चॅनल सुरु करू शकता. अनेक महिलांना स्वयंपाक, शिवणकाम, बेकिंग, सजावट किंवा येत असलेली कोणतीही कला दाखवणारं यूट्यूब चॅनल तुम्ही सुरु करू शकता.

अर्थात प्रत्येक व्यवसायात संयम हा गरजेचा असतो. त्याच प्रमाणे यूट्यूब चॅनल सुरु केल्यानंतरही तुम्हाला सबस्क्रायबर आणि व्ह्यूज मिळण्यासाठी प्रतिक्षा करावी लागेल. मात्र कालांतराने फालोअर्सच्या संख्येत वाढ झाल्याने तुम्हाला जाहिराती Advertisements मिळून तुमची कमाई सुरू होवू शकते.

होममेड फूड- होम मेड फूडमध्ये वेगवेगळी गटवारी करता येईल. यात सगळ्यातं पहिला पर्याय म्हणजे तुम्ही टिफिन सर्विसेस सुरु करू शकता किंवा मेस सुरु करू शकता. जर तुमच्या परिसरात कुटुंबापासून दूर राहणारे विद्यार्थी किंवा नोकरदार राहत असतील तर हा बिझनेस चांगला चालू शकतो.

त्याच प्रमाणे तुम्ही होममेड स्नॅक्स तयार करून ते पॅकिंग करून विकू शकता. अलिकडे अनेकजण हेल्दी खाण्याकडे Healthy Food लक्ष देऊ लागले आहेत. यामध्ये तुम्ही काही पौष्टिक लाडू किंवा विविध कुकिज किंवा चिवडा असे पदार्थ तयार करून विकू शकता.

हे देखिल वाचा-

आणखी पर्याय म्हणजे तुम्ही केवळ नाश्त्याचे पदार्थ देखील विकू शकता. अलिकडे वेळेच्या अभावी अनेकांना घरामध्ये नाश्ता करणं शक्य होत नाही. यासाठी तुम्ही केवळ नाश्त्याचे डबे पुरवू शकता. किंवा तुमच्या जवळील एखाद्या दुकानदाराशी चर्चा करुन कमिशनवर आधारित डील करून इडली चटणी, थेपले, समोसे अशा पदार्थांची पाकिट काउंटरवर विक्रीसाठी देऊ शकता.

अलिकडे इन्स्टाग्राम, फेसबुक तसचं व्हाटस्अप ग्रुप यामुळे मार्केटिंगचा मार्ग अगदी सोपा झाला आहे. सोशल मीडियाच्या मदतीने तुम्ही तुमच्या बिझनेसबद्दल प्रचार करू शकता.

आल्ट्रेशन - अलिकडे रेडिमेड कपड्यांनी मोठी पसंती दिली जाते. शिवणकाम किंवा कपडे म्हणजेच ड्रेस, ब्लाउज शिवण्यासाठी जास्त वेळ द्यावा लागतो. मात्र तुम्ही आल्ट्रेशनचा व्यवसाय करू शकता.

रेडिमेड ड्रेस किंवा इतर कपडे अल्टर म्हणजेच योग्य मापाचे करून देणं, तसचं तयार कपड्यांना डबल शिलाई मारून देणं, हे काम कमी वेळत होणारं असून यातून चांगली कमाई होवू शकते.

यासाठी तुम्ही तुमच्या परिसरातील काही ड्रेस विक्रेते किंवा इतर कपड्यांच्या दुकानदारांशी संपर्क साधून ग्राहकांना तुमचं नाव सुचवण्याची विनंती करू शकता.

बेकिंग- पार्ट टाइम व्यवसायामध्ये बेकिंग हा देखील एक चांगला पर्याय आहे. अलिकडे सेलिब्रेशन म्हटलं तर केक हवाच असतो. यासाठी तुम्ही घरी कस्टमाइज केकची ऑर्डर घेऊ शकता. केकसोबतच तुम्ही वेगवेगळ्या कुकिजही बेक करू शकता.

व्हाट्सअप स्टेटस किंवा फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या मदतीने तुम्ही ग्राहक वाढवू शकता.

डे केअर- जर तुम्ही एक गृहिणी आणि आई आहात तर तुमच्या साठी डे केअर सुरू करणं हा देखील एक चांगला पर्याय ठरू शकतो. जर तुमच्या घरात पुरेशी जागा असेल तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार २-३ मुलांसाठी देखील डे केअर सुरू करू शकता.

नोकरी करणाऱ्या अनेक महिला आपल्या मुलांसाठी उत्तम पाळणाघर शोधत असतात. जर तुम्ही पाळणाघरासाठी तुमच्या घरात उत्तम वातावरण तयार केलं आणि विश्वास संपादन केला तर यातूनही तुम्ही चांगली कमाई करू शकता.

हे देखिल वाचा-

ब्युटी पार्लर- तुम्हाल शक्य झाल्यास एखादा ब्युटी पार्लरचा कोर्स करून तुम्ही घरच्या घरी ब्युटी पार्लर सुरू करू शकता. हेअर कटपासून ते मेकअप आणि फेशियल अशा विविध सेवा देणं तुम्ही सुरु केल्यास आपोआप महिला तुमच्या होम पार्लरमध्ये येऊ लागतील.

घरात पार्लर सुरु करण्यासाठी तुम्ही सुरुवातीला अगदी कमी गुंतवणूक करू शकता. कालांतराने तुम्ही हा बिझनेस वाढवू शकता.

अशा प्रकारे अगदी कमी शिक्षण आणि कमी पैशातही तुम्ही हे व्यवसाय सुरू करू शकता. त्याचप्रमाणे जर एखाद्या विषयाचे म्हणजेच पेंटिंग, कुकिंग, बेकिंग, शिवणकाम असे क्लासेसही घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित शहांनी केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अभिनंदन

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे शिवाजी कर्डिले १४९८४ मतांनी आघाडीवर.

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT