Surat Diamond Bourse Esakal
Business

SDB : आता मुंबईतील डायमंड मार्केटही गुजरातला जाणार? सूरत डायमंड बोर्सची हिरे व्यापाऱ्यांना बंपर ऑफर

सध्या मुंबईत असलेले हिरे व्यापारी भारत डायमंड बोर्स याठिकाणाहून व्यापार करतात.

Sudesh

मुंबईतील उद्योगधंदे गुजरातला नेण्याचा प्रयत्न आतापर्यंत बऱ्याच वेळा झाला आहे. यातच आता मुंबईतील डायमंड मार्केटही गुजरातला जातं की काय, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. याला कारण आहे, सूरत डायमंड बोर्सने हिरे व्यापाऱ्यांना दिलेली मोठी ऑफर.

सूरत डायमंड बोर्स या हिरे व्यापारासाठीच्या इमारतीचं बांधकाम नुकतंच पूर्ण झालं आहे. 6.7 मिलियन स्क्वेअर फूट जागा असलेल्या या भव्य इमारतीचे वासे मात्र अद्याप पोकळ आहेत. अगदी कमी व्यापाऱ्यांनी याठिकाणी नोंदणी केली आहे. शिवाय, मुंबईतील हिरे व्यापारी अजूनही शहरातील भारत डायमंड बोर्समधूनच व्यापार करत आहेत. मात्र, याच व्यापाऱ्यांना सूरतमध्ये खेचण्यासाठी एक मोठी ऑफर देण्यात येत आहे.

काय आहे ऑफर?

सूरत डायमंड बोर्सने (SDB) शनिवारी (27 मे) जाहीर केलं, की जे हिरे व्यापारी 21 नोव्हेंबर पूर्वी सूरतला आपलं ऑफिस शिफ्ट करतील; त्यांना मेन्टेनन्स चार्ज द्यावा लागणार नाही. यामुळे व्यापाऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे. 21 नोव्हेंबर रोजी या इमारतीचं उद्घाटन होणार आहे.

किती होईल फायदा?

सध्या मुंबईत असलेले हिरे व्यापारी ऑपेरा हाऊसमधील पंचरत्न आणि बीकेसीमधील भारत डायमंड बोर्स याठिकाणांहून व्यापार करतात. भारत डायमंड बोर्समधील ऑफिससाठी भाडं हे 700 रुपये प्रति स्क्वे.फूट एवढं आहे. तर मेन्टेनन्स फी सुमारे 150-200 रुपये प्रति स्क्वे.फूट एवढी आहे. कित्येक व्यापारी बीकेसी सोबतच पंचरत्नमधील ऑफिसचं भाडं आणि मेन्टेनन्सही भरत आहेत. यामुळे, सूरतमधील ऑफर त्यांच्यासाठी नक्कीच फायद्याची आहे.

मुंबईकर सूरतला जाणार नाहीत

भारत डायमंड बोर्स (BDB) आणि पंचरत्नचे माजी सेक्रेटरी नरेश मेहता यांनी मात्र ही चिंतेची बाब नसल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले, की मुंबईतील 99 टक्के व्यापारी सूरतला जाणार नाहीत. ती इमारत शहरापासून 15 किलोमीटर बाहेर आहे, दळणवळणासाठी योग्य सुविधा नाहीत. शिवाय, बुलेट ट्रेन सुरू झाल्यानंतर मुंबई-सूरत हे अंतर अगदीच कमी होईल. या सगळ्या गोष्टींमुळे मुंबईतील व्यापारी तिकडे जाण्याची शक्यता कमी आहे.

सूरतमध्ये 'चार्म' नाही

मुंबईतील व्यापाऱ्यांसाठी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुंबईचं ग्लॅमर. बीकेसीमध्ये (BKC) दोन फाईव्ह स्टार हॉटेल्स आहेत. शिवाय, हा एरिया अगदी पॉश आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्लाएंट्सना सूरतला बोलावण्याऐवजी मुंबईला बोलावणं अधिक छाप पाडतं. शिवाय, बीकेसीमध्ये कस्टम्स क्लिअरिंग हाऊसही आहे, जे सूरतला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Whatsapp Call Recording : मिनिटांत रेकॉर्ड करा व्हॉट्सॲप कॉल, सोपी स्टेप वाचा एका क्लिकमध्ये..

Margashirsha Amavasya 2024: मार्गशीर्ष अमावस्येच्या शुभ मुहूर्तावर करा गंगा स्नान, जाणून घ्या महत्व

SCROLL FOR NEXT