Business

Vodafone Layoffs : आता वोडाफोनमध्येही लेऑफ! नवीन बॉसचा ११ हजार कर्मचाऱ्यांना झटका

ही कपात येत्या तीन वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

सध्या जगभरातील कित्येक कंपन्यांमध्ये लेऑफचा ट्रेंड सुरू आहे. यामध्येच आता भारतातील टेलिकॉम कंपनी वोडाफोनचाही क्रमांक लागला आहे. कंपनीच्या नवीन सीईओ वॅले यांनी तब्बल ११ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

मूळची ब्रिटीश कंपनी असलेल्या वोडाफोनचे यंदाच्या आर्थिक वर्षातील प्रदर्शन खराब होते. यामुळेच, कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात बदलांची गरज असल्याचे मत सीईओ मार्गारेटा डेला वॅले (Margherita Della Valle) यांनी व्यक्त केले. "आमचे प्राधान्य आमचे ग्राहक आहेत. आम्ही स्पर्धेत पुन्हा उतरण्याच्या दृष्टीने कंपनीमध्ये काही बदल करणार आहोत. आम्ही कंपनीच्या ग्रोथसाठी प्रयत्नशील आहोत", असं डेला यांनी स्पष्ट केलं.

वॅले यांना या महिन्यातच कंपनीच्या स्थायी सीईओ (Vodafone CEO) म्हणून घोषित करण्यात आले. त्यापूर्वी पाच महिने त्या अंतरिम सीईओ म्हणून कार्यरत होत्या. कायमस्वरूपी नियुक्ती झाल्यानंतर लगेच त्यांनी हा मोठा निर्णय (Vodafone Layoff) घेतला आहे. दरम्यान, ही कपात एकदम करण्यात येणार नसून, येत्या तीन वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने कर्मचाऱ्यांना कमी करणार असल्याचं वॅले यांनी यावेळी स्पष्ट केलं.

वॅले यांच्यापूर्वी निक रीड हे वोडाफोनचे सीईओ होते. त्यांच्या चार वर्षांच्या कारकीर्दीमध्ये कंपनीच्या शेअर्समध्ये भरपूर घसरण झाली. त्यानंतर डिसेंबर २०२२ मध्ये त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला होता.

वोडाफोन आहे तोट्यात

कंपनीच्या वार्षिक कमाईत गेल्या वर्षी १.३ टक्क्यांनी घट दिसून आली होती. तर, या आर्थिक वर्षामध्येही कंपनीच्या कमाईत कसलीच वाढ दिसून आली नाही. वोडाफोनने या वर्षाच्या सुरुवातीला इटलीमधील आपल्या १,००० कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले होते. तर, एका मीडिया रिपोर्टनुसार जर्मनीमधील १,३०० कर्मचाऱ्यांवरही लेऑफची टांगती तलवार होती.

वोडाफोनचे भारतातही मोठे नेटवर्क आहे. काही दिवसांपूर्वीच आयडिया आणि वोडाफोन एकत्र आले होते. तसेच, सरकारनेही वोडाफोनमधील काही भाग खरेदी केला होता. मात्र, वोडाफोनची आर्थिक घसरण अशीच सुरू राहिली, तर लेऑफचा फटका भारतातील कर्मचाऱ्यांनाही बसण्याची शक्यता दाट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित तू थोडक्यात वाचलास.. वाकून नमस्कार करणाऱ्या रोहित पवारांना अजित दादांचा मिश्किल टोला

दाऊदने मला जीवे मारण्याची धमकी दिली, म्हणून...; Lalit Modi यांचा धक्कादायक खुलासा; म्हणाले, शाहरुख खान...

TRAI New Rules : मोठी बातमी! 1 डिसेंबरपासून OTP बंद होणार? ग्राहकांचा फायदा की नुकसान, नेमकं प्रकरण वाचा

Share Market Opening: शेअर बाजारात मोठी वाढ; निफ्टी 24,200च्या पार, सेन्सेक्स 1300 अंकांनी वर, कोणते शेअर चमकले?

Latest Maharashtra News Updates : नाना पटोले यांनी दिला काॅंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

SCROLL FOR NEXT