ED Esakal
Sakal Money

लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात ईडीची पहिली धाड, जाणून घ्या काय आहे 20 हजार कोटींचा घोटाळा

ED Action On Amtek: आज सकाळपासून दिल्ली, गुरुग्राम, नोएडा, मुंबई आणि नागपूरमधील सुमारे 35 व्यावसायिक आणि निवासी परिसरांवर छापे टाकण्यात आले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

आशुतोष मसगौंडे

अंमलबजावणी संचालनालयाने (ED) गुरुवारी 20,000 कोटींहून अधिक रुपयांच्या कथित बँक फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या अमटेक कंपनी आणि तिच्या प्रवर्तकांविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीचा एक भाग म्हणून दिल्ली-एनसीआर, मुंबई आणि नागपूरमधील सुमारे 35 परिसरांची झडती घेतली.

अरविंद धाम, गौतम मल्होत्रा ​​यांच्यासह अमटेक ग्रुप आणि त्याच्या संचालकांवर छापे टाकण्यात येत आहेत. आज सकाळपासून दिल्ली, गुरुग्राम, नोएडा, मुंबई आणि नागपूरमधील सुमारे 35 व्यावसायिक आणि निवासी परिसरांवर छापे टाकण्यात आले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान सर्वोच्च न्यायालयानेही अंमलबजावणी संचालनालयाला या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सूत्रांनी सांगितले की, ईडीच्या म्हणण्यानुसार, या फसवणुकीमुळे सरकारी तिजोरीचे सुमारे 10,000-15,000 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

बँकेकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम रिअल इस्टेट, परकीय गुंतवणूक आणि नवीन उपक्रमांमध्ये गुंतवण्यात आल्याचा ईडीचा आरोप आहे.

सूत्रांनी सांगितले की, अधिक कर्ज मिळविण्यासाठी या ग्रुपच्या कंपन्यांमध्ये बनावट विक्री, भांडवली मालमत्ता, दायित्वे आणि नफा दाखवण्यात आला जेणेकरून त्यावर नॉन परफॉर्मिंग ॲसेट असे लेबल लावले जाऊ नये.

ईडीचा आरोप आहे की, सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअर्समध्ये फेरफार झाली आहे. शेल कंपन्यांच्या नावावर एक हजार कोटींची मालमत्ता जमा करण्यात आली आहे. काही परकीय मालमत्ता तयार केल्या गेल्या आहेत आणि पैसा अजूनही नवीन नावाने ठेवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; निफ्टी बँकेत तेजी, कोणते शेअर्स तेजीत?

IND vs AUS : विराट कोहलीला खुणावतोय राहुल द्रविडचा विक्रम; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर हव्यात फक्त १०२ धावा

तर 'कुछ कुछ होता हैं' मध्ये राणी मुखर्जी ऐवजी दिसली असती ऐश्वर्या राय; 'या' कारणामुळे दिलेला नकार, म्हणालेली-

Stock Market: कोण आहेत FPI आणि FII? त्यांच्यामुळे शेअर बाजार कोसळतो अन् तेजीत येतो?

महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण सुरू, 'अदृश्य' शक्तीने कारस्थान रचून दोन पक्ष फोडले; सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्ला

SCROLL FOR NEXT