PF Interest  esakal
Sakal Money

PF Rate: पीएफवर आता 8.25 टक्के व्याज; 7 कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ

PF Rate : केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी देशातील ७ कोटींहून अधिक कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) सदस्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी देशातील ७ कोटींहून अधिक कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) सदस्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने पीएफवरील ठेवींवरील व्याजदरात वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळं आता पीएफवर ८.२५ टक्के इतक्या दरानं व्याज मिळणार आहे. (EPFO Now 8 percent interest on PF More than 7 crore employees will get benefits)

फेब्रुवारीत ईपीएफओनं २०२३-२४ वर्षासाठी ८.२५ टक्के व्याज देण्याची घोषणा केली होती, त्याला गुरुवारी अर्थमंत्रालयाने मंजुरी दिली. ईपीएफओकडून याबाबत एक्सवर माहिती देण्यात आली आहे. ईपीएफओबाबत निर्णय घेणाऱ्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजने (सीबीटी) फेब्रुवारी महिन्यात २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी पीएफवरील व्याजदरात ०.१० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला होता.

त्यानुसार गतवर्षीच्या तुलनेत व्याजदरात वाढ करुन तो ८.१५ वरून ८.२५ टक्के करण्यात आला. याबाबतचा प्रस्ताव त्यांनी केंद्रीय अर्थमंत्रालयाकडे पाठविला होता, आता त्यास मंजुरी मिळाली आहे. पीएफधारकांना वर्षातून एकदाच म्हणजे ३१ मार्च रोजी पीएफवर व्याज दिलं जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT