Bank 
Sakal Money

DA Hike Bank Employees: बँक कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात 16 टक्के वाढीची घोषणा

इंडियन बँक असोसिएशननं (IBA) 10 जून 2024 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेद्वारे याची घोषणा केली.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : बँक कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्यात आला असून हा भत्ता मे, जून आणि जुलै 2024 साठी देण्यात येणार आहे. इंडियन बँक असोसिएशननं (IBA) 10 जून 2024 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेद्वारे याची घोषणा केली. या घोषणेनुसार हा महागाई भत्ता १५.९७ टक्के इतका असणार आहे. (Good news for bank employees announcement of DA hike 16 percent from may to july 2024)

8 लाख कर्मचाऱ्यांना होणार फायदा

यावर्षी मार्चमध्ये, IBA आणि बँक कर्मचारी संघटनांनी 17 टक्के वार्षिक वेतनवाढीवर सहमती दर्शविली होती. यामुळं सार्वजनिक क्षेत्रातील बँकांवर सुमारे 8,284 कोटी रुपयांचा अतिरिक्त वार्षिक खर्चाचा बोजा पडणार आहे. नोव्हेंबर 2022 पासून लागू होणाऱ्या वेतनवाढीचा फायदा तब्बल 8 लाख बँक कर्मचाऱ्यांना होणार आहे.

पाच दिवसांचा आठवडा

बँक कर्मचाऱ्यांनी पाच दिवसांचा कामाचा आठवडा व्हावा अशी मागणी केली आहे. इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) आणि बँक युनियननं या प्रस्तावावर सहमती दर्शवली आहे. पण आता सरकारच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. मार्च 2024 मधील संयुक्त घोषणेनं हा करार PSU बँक कर्मचाऱ्यांसाठी आठवड्यातून 5 दिवसांच्या कामाचा मार्ग मोकळा होईल. कारण संयुक्त घोषणेत सर्व शनिवारी बँक सुट्टी म्हणून ओळखली जाणार आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कामाचे किमान तास आणि ग्राहक सेवा कालावधी निश्चित करते ज्याचं पालन बँकांनी करणं आवश्यक आहे. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम अर्थात पीएसयू बँका पाच दिवसांचा कार्य आठवडा लागू करावा की नाही, यासाठी रिझर्व्ह बँकेनं केलेलं मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरेल, असंही आयबीएनं म्हटलं आहे. त्यामुळं सुधारित कामाचे तास सरकारच्या अधिसूचनेनंतरच लागू होतील, असंही आयबीएच्या अधिसुचनेत म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT