India Employment Report 2024 Esakal
Sakal Money

कौशल्याच्या आधारे किमान वेतनापासून भारतीय कामगार वंचित, 'India Employment Report 2024'मधून धक्कादायक खुलासे

Indian Workers: नियमित कर्मचाऱ्यांच्या सरासरी मासिक वास्तविक कमाईत सातत्याने घट होत आहे. 2012 मध्ये नियमित कर्मचाऱ्यांची सरासरी मासिक कमाई 12,100 रुपये होती. ती आता 10925 इतकी झाली आहे.

आशुतोष मसगौंडे

इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आणि इन्स्टिट्यूट फॉर ह्युमन डेव्हलपमेंट यांनी तयार केलेल्या ‘इंडिया एम्प्लॉयमेंट रिपोर्ट 2024’ या नवीन अहवालातून भारतातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीतील अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.

कामगारांना कौशल्याच्या आधारे किमान वेतन नाही

या अहवालानुसार, भारतातील कामगारांना त्यांच्या कौशल्याच्या आधारे किमान वेतन मिळत नाही, असे अहवालात म्हटले आहे. कामगारांच्या मोठ्या वर्गाला, विशेषत: तात्पुरत्या कामगारांना किमान वेतन दिले जात नाही.

राष्ट्रीय स्तरावर, विशेषतः कृषी क्षेत्रात, 40.8 टक्के नियमित कामगार आणि 51.9 टक्के अनौपचारिक कामगारांना त्या क्षेत्रातील अकुशल कामगारांसाठी निश्चित केलेले किमान वेतन मिळत नाही.

नियमित कामगारांना तोटा, तात्पुरत्या कामगारांची चांदी

अहवालानुसार, तात्पुरत्या कामगारांच्या बाबतीत उलट परिस्थिती उद्भवली आहे. म्हणजेच गेल्या दशकभरात त्यांच्या वास्तविक कमाईत वाढ झाली आहे.

2012 मध्ये तात्पुरत्या कामगारांचे सरासरी मासिक वास्तविक उत्पन्न 3,701 रुपये होते, जे 2019 मध्ये वार्षिक 2.4 टक्क्यांनी वाढून 4,364 रुपये आणि 2022 मध्ये वाढून 4,712 रुपये प्रति महिना झाले.

नियमित कर्मचाऱ्यांच्या कमाईत घट आणि स्वयंरोजगार, तात्पुरत्या कामगाराच्या कमाईत वाढ, याचा अर्थ असा आहे की 2000 ते 2022 या कालावधीत निर्माण झालेल्या नोकऱ्यांचा दर्जा वाढलेला नाही.

नियमित वेतन मिळवणाऱ्यांची वास्तविक कमाई घटली

या रिपोर्टनुसार, भारतातील नियमित वेतन मिळवणारे आणि स्वयंरोजगारांची वास्तविक कमाई गेल्या दशकात घटली आहे. सरकारी आकडेवारीवर आधारित या अहवालात चलनवाढीच्या आधारावर वास्तविक कमाईचा अंदाज लावण्यात आला आहे.

या अहवालानुसार, वर्षानुवर्षे नियमित कर्मचाऱ्यांच्या सरासरी मासिक वास्तविक कमाईत सातत्याने घट होत आहे. 2012 मध्ये नियमित कर्मचाऱ्यांची सरासरी मासिक कमाई 12,100 रुपये होती. 2019 मध्ये ती वार्षिक 1.2 टक्क्यांनी घसरून 11,155 रुपये प्रति महिना झाली. आता 2022 मध्ये ती 0.7 टक्क्यांनी घसरून 10,925 रुपये मासिक झाली आहे.

बांधकाम क्षेत्र

याशिवाय बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या कमाईचाही अहवालात उल्लेख करण्यात आला आहे. या क्षेत्राशी निगडित 39.3 टक्के नियमित कर्मचारी आणि 69.5 टक्के तात्पुरत्या कामगारांना दररोज अकुशल कामगारांसाठी विहित केलेले सरासरी किमान वेतन मिळत नाही.

स्वयंरोजगार करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कमाईत देखील घट झाल्याचे दिसून आले आहे. त्यांची वास्तविक कमाई वार्षिक 0.8 टक्क्यांनी घटली आहे. ती 2019 मध्ये सुमारे 7,017 रुपये प्रति महिना वरून 2022 मध्ये 6,843 रुपये प्रति महिना झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Lawrence Bishnoi : बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

Pune Assembly Eletion 2024 : मतदान केंद्रांच्या दोनशे मीटर परिसरात वाहने लावण्यास मनाई

SCROLL FOR NEXT