कार लोन फेडण्याचा फाॅर्म्युला Esakal
Investment

Car Loan फेडण्याची चिंता करण्याएवजी हा फॉर्मुला वापरा, असे संपतील EMI

तुम्हाला कार लोनचं हे ओझं लवकर कमी करायचं असेल किंवा यातून लवकर मुक्त व्हायचं असेल तर तुम्ही काही सोपे पर्याय निवडू शकता

Kirti Wadkar

प्रत्येक व्यक्तीचं कार खरेदी करण्याचं Car Purchase स्वप्न असतं. गेल्या काही वर्षांमध्ये कारच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे बजेच कार खरेदी करण्यासही तुम्हाला ५-६ लाख रुपये मोजावे लागतात. Money Tips how to repay car loan before maturity

अर्थात कार खरेदी करण्यासाठी अनेकजण कार लोनचा Car Loan पर्याय निवडतात. कार लोनमुळे आपल्या आवडीची कार खरेदी करण्यातं स्वप्न Dream तर पूर्ण होतं मात्र त्यानंतर पुढील ७-८ वर्ष हे कर्ज फेडण्याचं EMI ओझं कायम डोक्यावर राहतं.

कार लोन घेतल्यानंतर त्याचे EMI भरत असताना अनेकदा महिन्याचं आर्थिक गणित बिघडतं. हे कर्ज कधी संपतंय याची प्रत्येकजण वाट पाहू लागतात. मात्र जर तुम्हाला कार लोनचं हे ओझं लवकर कमी करायचं असेल किंवा यातून लवकर मुक्त व्हायचं असेल तर तुम्ही काही सोपे पर्याय निवडू शकता. 

कार खरेदी करत असताना आणि कार लोन घेत असताना थोडं संयमाने आणि अभ्यासपूर्ण आर्थिक नियोजन केल्यास तुमचं कार लोन लवकर फेडलं जाऊ शकतं. शिवाय व्याजाच्या पैशातही बचत होवू शकते. यासाठीच आम्ही तुम्हाला काही टिप्स देत आहोत. 

कारचं बजेट ठरवा

कार खरेदी करण्यापूर्वी तिचं बजेट ठरवणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजेच तुम्हाला किती लोन घ्याव लागणार आहे. त्यासाठी येणारा EMI याची कल्पना घ्या. केवळ लोन उपलब्ध होत आहे म्हणून बजेटच्या बाहेर जाऊन कार खरेदी केल्यानंतर अनेकदा काही काळाने त्याचे हप्ते भरताना मात्र अनेकांना टेन्शन येतं. यासाठी आधीच इतर भविष्यातील खर्चांचा अंदाज घेऊन बजेट ठरवा.

हे देखिल वाचा-  

डाउनपेमेंट

कार लोन घेत असताना किंवा कार खरेदी करत असताना शक्य तेवढं जास्त डाउनपेमेंट करण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमच्या मासिक खर्चावर ताण पडणार नाही. तस शक्य असल्यास लोनचा अवधी देखील कमी काळासाठी ठेवून तुम्हाला लोनमधून लवकर मुक्त होवू शकता. 

फायनॅन्शियल नियमांनुसार लोनचा अवधी हा ४ वर्षांपेक्षा जास्त काळ नसावा. त्यामुळेच कारचं बजेट ठरवल्यानंतर जास्तीत जास्त डाउनपेमेंट करण्याचा प्रयत्न करा. 

हे देखिल वाचा-

EMI भरा जास्त

जर तुम्हाला तुमचं कार लोन लवकर संपावं आणि तुमची व्याज्याच्या रक्कमेतही बचत व्हावी अशी इच्छा असेल, तर तुम्ही वर्षाला एक ज्यादा EMI भरल्यास तुम्हाला फायदा होईल. यासाठी तुमच्याकडे असलेल्या काही पर्यायांचा वापर करा. एकतर वर्षाला तुम्ही एक EMI ज्यादा भरू शकता.

दुसरा पर्याय म्हणजे महिन्याला EMI हून थोडी रक्कम जास्त भरा. म्हणजेच जर तुमचा EMI  १० हजार असेल तर दर महिन्याला १ हजार जास्त म्हणजेच ११ हजार भरा. यामुळेही तुमचं लोन टेन्युअर म्हणजे लोनचा कालावधी कधी होईल तसंच व्याज वाचेल. 

आणखी एक पर्याय म्हणजे पहिल्या वर्षी शक्य नसल्यास पुढील वर्षापासून तुम्ही EMI च्या रक्कमेत काही टक्क्यांनी वाढ करू शकता. 

प्रिपेमेंट 

कार लोन घेतल्यानंतर जरी तुम्हाला १ EMI  जास्त भरणं किंवा EMI  च्या रक्कमेत वर्षाला वाढ करणं शक्य झालं नाही तर तुम्ही शक्य तेव्हा प्रिपेमेंट करू शकता. म्हणजेच लोनच्या कालावधीमध्ये जर तुमच्याकडे एखादी मोठी रक्कम आल्यास तुम्ही प्रिपेमेंट करू शकता. यामुळे देखील तुमच्या लोनचा कालावधी कमी होऊन व्याज दरामध्ये बचत होईल. 

योग्य आर्थिक नियोजन केल्यास तुम्हाला वर सांगितलेल्या काही पर्ययांपैकी एखादा किंवा एकावेळी दोन पर्याय वापरता येतील. म्हणजेच EMI  वाढवणं आणि प्रिपेमेंटही  करणं अशा प्रकारे तुम्हीची लोनची परफेड लवकर होण्यास मदत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogi Adityanath : काँग्रेसमध्ये इंग्रजांचे ‘जिन्स’, पक्षाकडून जात, भाषेवरून देशात फूट : योगी आदित्यनाथ

Women’s Asian Champions Trophy: गतविजेत्या भारतीय महिला संघाचे घवघवीत यश; जपानवर मात करत गाठलं अव्वल स्थान

Priyanka Gandhi : भाजप सरकारचा महाराष्ट्राशी भेदभाव! प्रियांका गांधी यांचे गडचिरोलीतील सभेत टीकास्त्र

Sakal Podcast: मध्यमवर्गीयांना अच्छे दिन येणार ते पीएम मोदींना मिळाला 'ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर' पुरस्कार

Baramati Assembly constituency 2024 : बारामतीच्या सांगता सभांकडे राज्याचे लक्ष..!

SCROLL FOR NEXT