Car Loan Information Esakal
Loan

Car Buying Tips: कार खरेदी करायचीय? घरबसल्या मिळवा Car Loan आणि EMIची  माहिती

तुम्हाला बँकेत न जाताच कार लोन आणि त्यासाठी तुम्हाला साधारण किती EMI भरावा लागेल याची कल्पना हवी असेल तर ते तुम्हाला घर बसल्याही शक्य आहे.

Kirti Wadkar

Car Loan Information: स्वत:च घर खरेदी करण्यासोबतच एक गाडी खरेदी करणं अनेकांचं स्वप्न असतं. गाडी किंवा कार घेणं हा एक मोठा निर्णय असतो आणि अर्थातच यासाठी मोठी किंमत मोजावी लागते.

भारतात कार Car घ्यायची म्हंटलं तर कमीत कमी ५ ते ६ लाख रुपये मोजावे लागतात आणि महागडी कार घ्यायची म्हटलं तर तुम्ही अगजी करोडो रुपये खर्चू शकता. कार घेण्यासाठी मोठी रक्कम लागत असल्याने अनेकजण कर्ज Loan म्हणजेच कार लोन घेऊन कार खरेदी करतात. Avail Car Loan Information from Home

कार लोन Car Loan घेतल्यानंतर त्याचे दरमहा हप्ते EMI भरावे लागतात. तुम्ही किती कर्ज घेतलं आणि त्याचा कालावधी यावर हा कर्जाचा हप्ता ठरत असतो. अनेकजण तर कारचा हप्ता किती फेडता येईल. म्हणजेच दरमहा त्यांची EMI भरण्याची क्षमता किती आहे. यावर किती किमतीपर्यंतची कार खरेदी करायची हे ठरवतात.

कारसाठी कर्ज घेण्यासाठी साधारण सगळेच बँकेमध्ये जातात. इथे बँकेतील कार लोन खात्याची कर्मचारी कर्जासंबधी सर्व माहिती पुरवतात. मात्र तुम्हाला बँकेत न जाताच कार लोन आणि त्यासाठी तुम्हाला साधारण किती EMI भरावा लागेल याची कल्पना हवी असेल तर ते तुम्हाला घर बसल्याही शक्य आहे. 

घर बसल्या तुम्हाला कार लोनवरील व्याज तसच त्याचे कालावधीनुसार हप्ते याची माहिती मिळवणं शक्य आहे. तुम्हाला ज्या बँकेतून कर्ज घ्यायचं आहे त्या बँकच्या वेबसाइटवर जावून कार लोन इंटरेस्ट रेट म्हणजेच व्याज दर तपासावा आणि त्याची नोंद करावी.

हे देखिल वाचा-

कसा चेक कराल EMI

  • बँकेच्या वेबसाइटवरून व्याजदर तपसल्यावर तुम्हाला गुगुलवर जाऊन Car loan EMI Calculator हे सर्च करायचं आहे. 

  • तुमच्या समोर अनेक वेगवेगळ्या वेबसाइट ओपन होतील जिथे Car loan EMI Calculator असेल. यातील एक निवडा.

  • यानंतर त्या पेजवरील कॅलक्यूलेटर ओपन होईल. यात तुम्हाला आता माहिती भरायची आहे. 

  • तुम्हाला यात गाडीच्या किमतीनुसार किती लोन हवंय ते ऍड करावं लागेल. त्यानंतर बँकेच्या वेबसाइटनुसार जो व्याज दर असेल तो ऍड करावा लागेल.  तसचं किती काळासाठी लोन हवंय ही माहिती पुरवावी लागेल.

ही सर्व माहिती पुरवल्यानंतर तुम्हाला EMI ची माहिती उपलब्ध होईल. यावरून तुम्हाला तुमच्या कार लोनसाठी महिन्याला किती हप्ता भरावा लागेल याचा साधारण अंदाज येऊ शकतो. 

या Car loan EMI Calculator च्या मदतीने तुम्ही वेगवेगळ्या बँकांचे व्याज दर तपासून व्याजाची रक्कम कमी जास्त करून किती EMI भरावा लागू शकतो याचा अंदाज बांधू शकता. यामुळे तुम्हाला गाडीची निवड करणं देखील सोप जाऊ शकतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT