Supreme Court on Electoral Bonds: सध्या इलेक्टोरल बाँडबाबतचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. दरम्यान, न्यायालयाने काल पुन्हा एकदा एसबीआयला फटकारले आहे. सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की, SBI ला सर्व तपशील उघड करण्यास सांगितले होते आणि त्यात इलेक्टोरल बाँडची संख्या देखील समाविष्ट होती. एसबीआयने तपशील जाहीर करताना माहिती लपवू नये, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. (10 prominent individuals from corporate world bought Electoral bonds)
SBI कडे असलेल्या इलेक्टोरल बाँडशी संबंधित सर्व माहिती सार्वजनिक करावी असे सर्वोच्च न्यायालयाचे म्हणणे आहे. या दरम्यान, देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की SBI निवडक माहिती देऊ शकत नाही. न्यायालयाने सांगितले की, आम्ही एसबीआयला संपूर्ण माहिती देण्यास सांगितले होते. तुम्हाला न्यायालयाचा आदेश समजायला हवा होता.
निवडणूक आयोगाने गेल्या आठवड्यातच इलेक्टोरल बाँडची आकडेवारी आपल्या वेबसाइटवर सार्वजनिक केली आणि देशभरात खळबळ उडाली. इलेक्टोरल बाँड खरेदी करणाऱ्यांमध्ये अनेक मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. निवडणूक आयोगानुसार, Future Gaming, Megha Engineering आणि Quixplychain Pvt Ltd हे इलेक्टोरल बाँडचे सर्वात मोठे 3 खरेदीदार आहेत. एप्रिल 2019 ते जानेवारी 2024 दरम्यान किमान 333 व्यक्तींनी 358.91 कोटी रुपयांचे इलेक्टोरल बाँड खरेदी केले आहेत.
यापैकी, 15 प्रमुख व्यक्तींची हिस्सेदारी 158.65 कोटी रुपये किंवा 44.2% इतकी आहे, असे वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले आहे, त्यापैकी बहुतेक व्यक्ती मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांशी संबंधित आहेत.
या प्रमुख व्यक्तींमध्ये लक्ष्मी निवास मित्तल, लक्ष्मीदास वल्लभदास मर्चंट, इंदर ठाकूरदास जयसिंघानी, राजेश राजेश मन्नालाल अग्रवाल, हरमेश राहुल जोशी आणि राहुल जगन्नाथ जोशी, किरण मुझुमदार शॉ यांसारख्या नावांचा समावेश आहे.
1. लक्ष्मी निवास मित्तल यांनी 18 एप्रिल 2019 रोजी त्यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान 35 कोटी रुपयांचे इलेक्टोरल बाँड खरेदी केले. लक्ष्मी निवास मित्तल हे 1,670 कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत.
2. राजेश मन्नालाल अग्रवाल यांनी जानेवारी 2022 ते ऑक्टोबर 2023 दरम्यान 13 कोटी रुपयांचे इलेक्टोरल बाँड खरेदी केले. राजेश हे अजंता फार्मा लिमिटेडचे मालक आणि सह-संस्थापक आहेत.
3. हरमेश राहुल जोशी आणि राहुल जगन्नाथ जोशी यांनी जानेवारी 2022 आणि नोव्हेंबर 2023 मध्ये प्रत्येकी 10 कोटी रुपयांचे इलेक्टोरल बाँड खरेदी केले. हे दाघे ओम फ्रेट ग्रुप ऑफ कंपनी या कंपनीशी संबंधित आहेत.
4. किरण मुझुमदार शॉ यांनी एप्रिल 2023 मध्ये 6 कोटी रुपयांचे इलेक्टोरल बाँड खरेदी केले. किरण या बायोकॉनच्या अध्यक्षा आणि संस्थापक आहेत.
5. लक्ष्मीदास वल्लभदास मर्चंट यांनी नोव्हेंबर 2023 मध्ये 25 कोटी रुपयांचे इलेक्टोरल बाँड खरेदी केले. मर्चंट हे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडशी संबंधित चार्टर्ड अकाउंटंट आहेत.
6. राहुल भाटिया यांनी एप्रिल 2021 वैयक्तिकरित्या 20 कोटी रुपयांचे इलेक्टोरल बाँड खरेदी केले. याशिवाय, इंडिगोच्या इतर तीन संस्था - इंटरग्लोब एव्हिएशन, इंटरग्लोब एअर ट्रान्सपोर्ट आणि इंटरग्लोब रिअल इस्टेट व्हेंचर्स यांनीही एकूण 36 कोटी रुपयांचे इलेक्टोरल बाँड खरेदी केले.
7. सुधाकर कंचर्ला यांनी 12 एप्रिल 2023 रोजी 5 कोटी रुपयांचे इलेक्टोरल बाँड खरेदी केले. परदेशात राहणारे कंचर्ला योडा ग्रुपचे चेअरमन आणि देवांश लॅब वर्क्सचे संस्थापक आहेत.
8. अभिजित मित्रा यांनी ऑक्टोबर 2023 मध्ये 4.25 कोटी रुपयांचे इलेक्टोरल बाँड खरेदी केले. मित्रा हे कोलकाता-BRD सीरॉक इन्फ्राप्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आहेत.
9. इंदर ठाकूरदास जयसिंघानी यांनी प्रिल आणि ऑक्टोबर 2023 मध्ये 14 कोटी रुपयांचे इलेक्टोरल बाँड खरेदी केले. जयसिंघानी हे पॉलीकॅब ग्रुप ऑफ कंपनीजचे अध्यक्ष आणि एमडी आहेत.
10. इंद्राणी पटनायक यांनी 10 मे 2019 रोजी 5 कोटींचे इलेक्टोरल बाँड खरेदी केले. इंद्राणी या भारतातील सर्वाधिक कर भरणाऱ्यांपैकी एक आहे. त्या नऊ कंपन्यांच्या संचालक आहेत ज्या प्रामुख्याने खाण व्यवसायात आहेत. 20 जुलै 2015 रोजी त्यांचा मुलगा अनुराग याची ईडीने चौकशी केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.