Aadhar Pan Linking esakal
Personal Finance

PAN Card: तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय झाले तर तुम्ही 'हे' 15 आर्थिक व्यवहार करू शकणार नाहीत

गुंतवणूक, कर्ज आणि व्यवसायाशी संबंधित अनेक गोष्टी पॅनशिवाय करता येणार नाहीत.

राहुल शेळके

PAN Card: पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याची अंतिम तारीख 30 जून होती. या तारखेपर्यंत पॅन लिंक न केल्यास, तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होईल. म्हणजेच तुम्ही अनेक आर्थिक गोष्टी करू शकणार नाही. येथे पैशांशी संबंधित 15 गोष्टी आहेत, ज्या तुम्ही करू शकणार नाही.

पॅन काम करत नसल्यामुळे अशा लोकांची एक-दोन नव्हे, तर 15 कामे अडकणार आहेत. यातील अनेक गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. गुंतवणूक, कर्ज आणि व्यवसायाशी संबंधित अनेक गोष्टी पॅनशिवाय करू शकणार नाहीत.

सरकारने पॅन आणि आधार लिंक करण्याचा आग्रह धरला होता कारण वाढत्या कर बेसनंतर सर्वांवर लक्ष ठेवण्याची गरज होती. यामुळेच आयकर कायदा 1961 च्या कलम 139AA अंतर्गत पॅनला आधारशी लिंक करणे आवश्यक करण्यात आले होते.

30 जून ही अंतिम मुदतही ठेवण्यात आली होती आणि ज्यांची ती चुकली, त्यांचे पॅन कार्ड 1 जुलैपासून निष्क्रिय झाले आहे. ज्यांचे पॅन निष्क्रिय झाले आहेत, त्यांना 15 प्रकारच्या कामांमध्ये अडचणी येतील.

पॅन कार्ड निष्क्रिय असल्यास हे 15 व्यवहार होणार नाहीत

आयकर विभागाच्या वेबसाइटनुसार, 15 आर्थिक व्यवहार पूर्ण होऊ शकत नाहीत.

  • तुमचा पॅन लिंक नसेल तर तुम्ही सहकारी बँकेत, खाजगी बँकेत खाते उघडू शकणार नाही.

  • क्रेडिट आणि डेबिट कार्ड देखील घेता येणार नाही

  • शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी डिमॅट खाते उघडता येणार नाही

  • परदेशात प्रवास करण्यासाठी 50,000 रुपयांचे एकावेळ पेमेंट करता येणार नाही

  • एकाच वेळी 50 हजारांपेक्षा जास्त रक्कम बँकेत भरता येणार नाही

  • म्युच्युअल फंडामध्ये एकावेळी 50 हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम भरता येणार नाहीत

  • कोणत्याही संस्थेला 50 हजार रुपयेही देऊ शकणार नाहीत

  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये रोखे खरेदी करण्यासाठी देखील एका वेळी 50 हजारांपेक्षा जास्त पैसे भरता येणार नाहीत

  • कोणत्याही बँकेत एफडी किंवा कोणत्याही योजनेत वार्षिक 5 लाख रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करणे शक्य होणार नाही.

  • बँक ड्राफ्ट, पे ऑर्डर किंवा चेक घेण्यासाठी 50 हजारांपेक्षा जास्त पैसे भरता येणार नाहीत

  • जीवन विमा कंपनीला प्रीमियम म्हणून एका आर्थिक वर्षात रु. 50,000 पेक्षा जास्त रक्कम भरता येणार नाही

  • 1 लाख रुपयांच्या वरच्या शेअर्सच्या व्यवहारांवर बंदी

  • निष्क्रिय पॅन मधून पेमेंटवर कर कपात

  • मोटार वाहन किंवा दुचाकीशिवाय इतर कोणत्याही वाहनाची विक्री किंवा खरेदी करता येणार नाही

  • 10 लाख रुपयांपेक्षा जास्त असलेल्या कोणत्याही स्थावर मालमत्तेची विक्री किंवा खरेदी करता येणार नाही

  • 2 लाख रुपयांच्या वरच्या वस्तूंच्या खरेदी-विक्रीवर जास्त कर लागेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT