Larsen & Toubro L&T India Sakal
Personal Finance

Larsen & Toubro L&T India : लार्सन एंड टुब्रोला 15000 कोटीची मेगा ऑर्डर, शेअर्सवर चांगला परिणाम...

सकाळ वृत्तसेवा

लार्सन एंड टुब्रो लिमिटेडच्या (Larsen & Toubro Limited) रिन्यूएबल एनर्जी आर्मला मिडिल ईस्टमधील एका लीडिंग डेव्हलपरकडून 'मेगा' ऑर्डर मिळाली आहे. एकूण 3.5 गिगावॅट कॅपिसिटीचा दोन गिगावॅट स्केलचा सोलर पीव्ही प्लांट तयार करण्यासाठीची ही ऑर्डर आहे. कंपनीने 10,000 कोटी ते 15,000 कोटी रुपयांच्या ऑर्डर्सचे वर्गीकरण 'मेगा' म्हणून केले आहे.

दरम्यान नुकतीच कंपनीच्या शेअर्समध्ये 0.06 टक्क्यांची वाढ दिसून आली. हा शेअर बीएसईवर सध्या 3630.60 रुपयांवर ट्रेड करत आहे. कंपनीचे मार्केट कॅप 4.99 लाख कोटी आहे. लार्सन अँड टुब्रोला दिलेल्या ऑर्डरमध्ये पूलिंग सबस्टेशन्स आणि ओव्हरहेड ट्रान्समिशन लाइन्ससह ग्रिड इंटरकनेक्शन्सचाही समावेश आहे.

विस्तृत इंजिनिअरिंग आणि इनिशियल कंस्ट्रक्शन लवकरच सुरू होईल असे कंपनीने सांगितले. लार्सन अँड टुब्रोला भारतातील सोलर आणि स्टोरेज प्लांटसाठी ऑर्डर मिळाल्याचे गेल्या महिन्यात कंपनीने सांगितले.

आता मिडल इस्टमधील नवीन मेगा ऑर्डरसह, कंपनीचा रिन्यूएबल एनर्जी पोर्टफोलिओ 22 GWp एकूण क्षमतेपर्यंत पोहोचणार आहे, ज्यामध्ये आधीच कार्यरत सोलर आणि विंड जनरेशन प्रोजेक्ट्स आणि बांधकामाधीन प्रोजेक्ट्सचा समावेश आहे, असे कंपनीने म्हटले आहे.

सतत मिळणाऱ्या ऑर्डर्समुळे आम्हाला प्लांटची कार्यक्षमता, वर्कफोर्स मोबलायझेशन, सेफ्टी, क्वालिटी आणि टाइमलाइनच्या संदर्भातील आवश्यकता पूर्ण करण्यास मदत झाल्याचे लार्सन एंड टुब्रोचे होल-टाइम डायरेक्टर आणि सीनिअर एग्झिक्यूटिव्ह वाइस प्रेसिडेंट (यूटिलिटीज) टी माधव दास म्हणाले.

दरम्यान सस्टनेबल एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करण्यात आणि स्मार्ट लाइफस्टाइल प्रदान करण्यात मिडल ईस्ट खूप पुढे असल्याचे एल अँड टीचे अध्यक्ष आणि एमडी एसएन सुब्रमण्यन म्हणाले. ही ऑर्डर आमच्या ग्रीन पोर्टफोलिओमध्ये वेलकम एडिशन आहे कारण आम्ही नेक्स्ट जनरेशन टेक्नॉलॉजीसह भविष्यातील कंपनी तयार करत असल्याचे ते म्हणाले.

गेल्याच आठवड्यात कंपनीच्या एनर्जी हायड्रोकार्बन्स वर्टिकलला ओएनजीसी लिमिटेडकडून भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील पाइपलाइन बदलण्याच्या आठव्या टप्प्यासाठी ऑर्डर मिळाली. गेल्या एका वर्षात हा स्टॉक 48.07% वाढला आहे. त्याच वेळी, या स्टॉकने गेल्या चार वर्षांत 290 टक्के नफा कमावला आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

Maratha Reservation : आता वेळ वाढवून देणार नाही; मनोज जरांगे पाटील

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Vaman Mhatre यांच्या अडचणी वाढणार! FIR व्हायरल केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीडित मुलीच्या आईची मागणी

AFG vs SA 1st ODI : अफगाणिस्तानने इतिहास घडवला, दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला

SCROLL FOR NEXT