1895 crore profit for Indigo in the fourth quarter InterGlobe Aviation Sakal
Personal Finance

IndiGo : इंडिगोला चौथ्या तिमाहीत १८९५ कोटींचा नफा

कंपनीने चौथ्या तिमाहीत एकूण उत्पन्न १४,६०० कोटी रुपयांवरून १८,५०५ कोटी रुपयांवर पोहोचले.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : देशातील सर्वांत मोठी विमान कंपनी आणि इंडिगोची पालक कंपनी इंटरग्लोब एव्हिएशन कंपनीने मार्च २०२४ ला संपलेल्या तिमाहीत १८९५ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत ९१९ कोटी रुपये नफा मिळाला होता. त्या तुलनेत यंदा यात दुप्पट वाढ झाली आहे.

कंपनीने चौथ्या तिमाहीत एकूण उत्पन्न १४,६०० कोटी रुपयांवरून १८,५०५ कोटी रुपयांवर पोहोचले. मार्च तिमाहीत प्रवासी तिकिटाचा महसूल वार्षिक२५ टक्क्यांनी वाढून १५,६०१ कोटी रुपये झाला आहे, तर अनुषंगिक महसूल वार्षिक १९ टक्क्यांनी वाढून १७१९ कोटी रुपये झाला आहे. इतर उत्पन्न वार्षिक ५५ टक्क्यांनी वाढून ६८० कोटी रुपये झाले आहे.

आर्थिक वर्ष २४ हे अनेक उल्लेखनीय कामगिरी आणि टप्पे असलेले वर्ष आहे. संपूर्ण आर्थिक वर्ष २०२४ साठी, आम्ही सुमारे ८२०० कोटी रुपये निव्वळ नफ्यासह सुमारे ७१,२०० कोटी रुपये इतके आतापर्यंतचे सर्वोच्च एकूण उत्पन्न नोंदवले आहे,

असे इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर एल्बर्स म्हणाले. कंपनीने उत्तम धोरणांची प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे सातत्यपूर्ण परिणाम मिळाले असल्याचेही त्यांनी सांगितले. मार्चच्या अखेरीस, एअरलाइनकडे ३६७ विमानांचा ताफा होता, ज्यात भाडेतत्त्वावरील १३ विमानांचा समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT