Success Story: जगात पैसे कमवण्याचे अनेक मार्ग आहेत. काही लोक असे आहेत जे रद्दी विकून पैसे कमवतात, मग ते लोखंड असो वा इलेक्ट्रॉनिक कचरा. याच कल्पनेतून एमबीए पदवीधर मुलाने त्याच्या मित्रासोबत 200 कोटींची कंपनी स्थापन केली आहे.
साकेत सौरव आणि त्याचा पार्टनर अवनीत सिंग यांनी 2017 मध्ये स्टार्टअप कंपनी सुरू केली. यातून त्यांनी जुने मोबाईल विकण्याचा व्यवसाय सुरू केला.
2011 मध्ये इंटरनॅशनल स्कूल ऑफ बिझनेस अँड मीडियामधून एमबीए पूर्ण केल्यानंतर साकेत सौरवने अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये काम केले.
पण 6 वर्षांनंतर 2017 मध्ये साकेतने त्याच्या मित्रासोबत जुने मोबाइल फोन विकण्यासाठी रिफिट ग्लोबल प्लॅटफॉर्म सुरू केला. ज्यामध्ये त्याने आपल्या वितरणाद्वारे जुने फोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू विकण्यास सुरुवात केली आणि या व्यवसायात त्याला मोठे यश मिळाले.
आधी जुना मोबाईल घ्या, नंतर दुरुस्त करून विका:
विशेष म्हणजे पहिल्या वर्षीच साकेत आणि त्याच्या मित्राला जुने फोन विकण्याच्या या व्यवसायात मोठे यश मिळाले. सुरुवातीला कंपनीचा महसूल 8 कोटी, नंतर 19 कोटी, नंतर 24 कोटी आणि 44 कोटींवर पोहोचला.
2021-22 या आर्थिक वर्षात त्यांच्या कमाईने 100 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या आर्थिक वर्षात त्यांनी 200 कोटींचा महसूल मिळवला.
YourStory नुसार, Refit Global ने Flipkart, Amazon, Oppo, Xiaomi आणि Vivo वर एक्सचेंज फोन खरेदी केले.
या मोबाईल फोन्समध्ये तांत्रिक आणि लूकशी संबंधित दुरुस्ती करून फोन पुन्हा तयार करण्यात आले. यानंतर रिफिट ग्लोबलने विविध वितरणाद्वारे हे मोबाईल फोन विकले.
रिफिट ग्लोबल प्रत्येक मोबाइल फोनची गुणवत्ता 37 पॉइंट्सवर तपासते आणि फोन वापरण्यासाठी पूर्णपणे योग्य असल्याची खात्री पटल्यानंतरच त्याची विक्री करते.
मोबाईल फोन व्यतिरिक्त, ते इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सची दुरुस्ती देखील करतात. त्यांचे 80 टक्के फोन फ्लिपकार्टवर विकले जातात. याशिवाय इतर ई-विक्रेते 20 टक्के फोन विकतात.
गेल्या वर्षी त्याने 5 लाख जुने मोबाईल विकले. साकेत सौरवने सांगितले की त्यांचे फोन नवीन मोबाईल फोनच्या तुलनेत 70 टक्क्यांपर्यंत स्वस्त आहेत.
हे फोन सेकेंडहँड वस्तू विकणाऱ्या दुकानदारांना विकले जातात, जे ते ग्राहकांना विकतात. त्यांना या आर्थिक वर्षात त्यांच्या व्यवसायातून 350 कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.