21 states announcement, You will get big discount on new car by scrapping your old car  Sakal
Personal Finance

Big Discount: केंद्रानंतर 21 राज्यांनी केली घोषणा! जुनी कार स्क्रॅप करून नवीन कारवर मिळेल 50 हजारांची सूट

Big Discount On New Car: देशातील 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी एक मोठी घोषणा केली आहे. जर कोणी आपली जुनी कार स्क्रॅप म्हणून दिली तर त्याला राज्य सरकारकडून नवीन कारवर सवलत दिली जाईल.

राहुल शेळके

Big Discount On New Car: देशातील 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी एक मोठी घोषणा केली आहे. जर कोणी आपली जुनी कार स्क्रॅप म्हणून दिली तर त्याला राज्य सरकारकडून नवीन कारवर सवलत दिली जाईल. केंद्र सरकारने राज्य सरकारांना आपापल्या राज्यांमध्ये जुन्या वाहनांचे स्क्रॅपिंग अनिवार्य करण्यास सांगितले आहे.

त्यानंतर बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, पंजाब आणि केरळसह 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी मोटर वाहन किंवा रोड टॅक्समध्ये सूट जाहीर केली आहे.

कोणत्या वाहनासाठी किती सूट?

राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सरकारे जुन्या वाहनांना स्क्रॅप करण्याऐवजी नवीन कार खरेदीवर 25 टक्के सवलत आणि व्यावसायिक वाहनांवर 15 टक्क्यांपर्यंत सूट देणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 21 पैकी 17 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी जुन्या वाहनांना स्क्रॅप केल्यानंतर नोंदणी दरम्यान व्यावसायिक किंवा वाहतूक वाहनांना 15 टक्के रोड टॅक्स सवलत दिली जाईल असे म्हटले आहे.

खासगी वाहनांच्या बाबतीत, 12 राज्ये रोड टॅक्समध्ये 25 टक्के सूट देत आहेत. हरियाणा स्क्रॅप मूल्याच्या 10 टक्के किंवा 50 टक्क्यांपेक्षा कमी सवलत देत आहे. दुसरीकडे, उत्तराखंड 25 टक्के किंवा 50,000 रुपये यापैकी जी कमी असेल ती सूट देत आहे. कर्नाटक नवीन वाहनाच्या किमतीनुसार रोड टॅक्समध्ये सूट देत आहे. उदाहरणार्थ, 20 लाख रुपयांपेक्षा जास्त किंमत असलेल्या कारवर 50,000 रुपयांची सूट मिळेल.

रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सरकारने ऐच्छिक वाहन स्क्रॅपिंगला प्रोत्साहन दिल्यापासून, 37 नोंदणीकृत स्क्रॅपिंग केंद्रे सुरु झाली आहेत. सध्या 16 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये अशी 52 केंद्रे कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे, वाहन फिटनेस तपासण्यासाठी 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 52 चाचणी केंद्रे सुरु आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Press Conference: 'एक है तो सेफ है'वर राहुल गांधींची मार्मिक टिप्पणी; 'सेफ'मधून अदानी-मोदींचा फोटो काढत केलं 'लक्ष्य'

Maharashtra Weather Update: तापमानात घट, महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार! जाणून घ्या हवामानाची स्थिती

मी बोलायला लागलो, तर घड्याळवाल्यांचा 'कार्यक्रमच' होईल; जयंत पाटलांचा अजितदादा गटाला थेट इशारा

Hypersonic Missile : एका सेकंदात 3.087 KM स्पीड, अर्धा चीन अन् पूर्ण पाकिस्तान रेंजमध्ये, जाणून घ्या भारताच्या नव्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची ताकद

अभिनेत्री कश्मिरा शाहचा भयानक अपघात; रक्ताने माखले कपडे; पोस्ट शेअर करत सांगितलं नेमकं काय घडलं

SCROLL FOR NEXT