26 cyber criminal caught in cbi trap mission name as chakra 3  sakal
Personal Finance

देशातील २६ सायबर गुन्हेगार अडकले ‘चक्र’व्यूहात; CBIची कारवाई

संघटित सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या(सीबीआय) वतीने विविध राज्यांत कारवाई करण्यात आल्याची माहिती सोमवारी अधिकृत सूत्रांनी दिली.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : संघटित सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या(सीबीआय) वतीने विविध राज्यांत कारवाई करण्यात आल्याची माहिती सोमवारी अधिकृत सूत्रांनी दिली. या कारवाईमध्ये विविध राज्यांतून २६ गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. सीबीआयने केलेल्या या कारवाईला ‘चक्र-३’ असे नाव दिले होते.

सीबीआयने केलेल्या या कारवाईमध्ये देशभरातील सुमारे ३२ ठिकाणी छापे घालण्यात आले. या कारवाईमध्ये सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सुमारे ५८.४५ लाखांची रोकड, लॉकरच्या किल्ल्या आणि तीन आलिशान गाड्या जप्त केल्या आहेत.

अटक करण्यात आलेल्या सायबर गुन्हेगारांनी देशासह विदेशातील अनेक नागरिकांना फसविल्याचे उघड झाले आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी मागील गुरुवारी पुणे, हैदराबाद, अहमदाबाद आणि विशाखापट्टणम येथे कारवाई करत सायबर गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या. या दरम्यान सीबीआयने १७० जणांची झडती घेतली.

या कारवाईमध्ये सीबीआयने सायबर गुन्हेगारांकडून विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणे, मोबाईल फोन, लॅपटॉप अनेक जणांच्या आर्थिक खात्यांची माहिती असणारी गोपनीय कागदपत्रे जप्त केली आहेत. त्याचप्रमाणे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून अनेक नागरिकांच्या गोपनीय माहितीची कागदपत्रे जप्त केली आहेत. या कारवाईमुळे सायबारगुन्हे जगतातील मोठे जाळे उद्‍ध्वस्त करण्यात सीबीआयच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे.

अशी करत फसवणूक

सायबर गुन्हेगार सर्वप्रथम पीडितांना सांगत की, त्यांच्या बँक खात्याचा वापर तोतया व्यक्तीकडून करण्यात आला असून त्याने त्यांच्या बँक खात्याच्या माध्यमातून मोठ्याप्रमाणात बेकायदा व्यवहार केले आहेत, यामुळे संबंधित पीडितांच्या देशातील तपास संस्था त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत. त्यानंतर सायबर गुन्हेगार त्यांना नव्या बँक खात्यात पैसे भरायला सांगत आणि त्यांची फसवणूक करत.

अमेरिकेतील नागरिकांच्या सिस्टिम केल्या हॅक

कारवाई करण्यात आलेले सायबर गुन्हेगार हे तंत्रज्ञान साहाय्य देत असल्याचे भासवून किंवा तोतया नावांनी फसवणूक करत. या गुन्हेगारांनी विदेशातील, विशेषतः अमेरिकेतील अनेकांच्या सिस्टिम हॅक करून त्यांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.

पुण्यातून दहा जणांना अटक

‘चक्र-३’ मोहिमेअंतर्गत सीबीआयने केलेल्या कारवाईमध्ये पुण्यातून दहा सायबर गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्याचप्रमाणे हैदराबाद येथून पाच, तर विशाखापट्टणम येथून ११ सायबर गुन्हेगारांना अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Mega Auction 2025 : रांचीचा 'गेल'! CSK हवा होता संघात, पण Mumbai Indians ने दिली मात; जाणून घ्या कोण हा Robin Minz

Shiv Sena Leader: मोठी बातमी! शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड; मुख्यमंत्री कोण होणार?

IPL 2025 Auction Live: जोफ्रा आर्चर पुन्हा राजस्थान संघात, तर Mumbai Indiansने सर्वात पहिल्यांदा खरेदी केला 'हा' खेळाडू

NCP Ajit Pawar Party : ‘राष्ट्रवादी’च्या पक्षनेतेपदी अजित पवार; नवनिर्वाचितांच्या बैठकीत निर्णय

Maharashtra Assembly : विधानसभेत यंदा ७० नव्या चेहऱ्यांची प्रथमच ‘एन्ट्री’; दिग्गजांना धूळ चारत ठरले ‘जायंट किलर’

SCROLL FOR NEXT