27 companies including dell hp cleared for pli over 50000 jobs expected says ashwini vaishnaw  Esakal
Personal Finance

सरकारचा मोठा निर्णय! 'या' क्षेत्रात उपलब्ध होणार 50 हजार नोकऱ्या, देशात येणार मोठी गुंतवणूक

Ashwini Vaishnaw: सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी डेल, एचपी, फॉक्सकॉन आणि लेनोवोसह एकूण 40 कंपन्यांनी पीएलआय योजनेसाठी अर्ज केले होते.

राहुल शेळके

Ashwini Vaishnaw: जर तुम्ही टेक आणि आयटी क्षेत्रात नोकरी शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण, या क्षेत्रात 50,000 नवीन रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे. खरं तर, सरकारने IT हार्डवेअरसाठी नवीन प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI) योजनेअंतर्गत Dell, HP, Flextronics आणि Foxconn सह 27 कंपन्यांना मान्यता दिली आहे.

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली आहे. सरकार IT हार्डवेअर कंपन्यांना प्रोत्साहन देऊन आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. यासह केंद्र सरकार देशात मॅन्युफॅक्चरिंगची स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहे.

अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, यापैकी 23 कंपन्या तात्काळ उत्पादनाचे काम सुरू करण्यास तयार आहेत, तर आणखी चार कंपन्या येत्या 90 दिवसांत उत्पादनाचे काम सुरू करतील. सरकारच्या या निर्णयामुळे उत्पादन क्षेत्रात 3,000 कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे, तर 50 हजार लोकांना थेट आणि 1.5 लाख लोकांना अप्रत्यक्ष नोकऱ्या मिळण्याची अपेक्षा आहे.

40 कंपन्यांनी अर्ज केले होते

या सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी डेल, एचपी, फॉक्सकॉन आणि लेनोवोसह एकूण 40 कंपन्यांनी पीएलआय योजनेसाठी अर्ज केले होते. योजनेअंतर्गत लॅपटॉप, टॅब्लेट, सर्व्हर आणि 4.65 लाख कोटी रुपयांचे उत्पादन समाविष्ट आहेत.

अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, ज्या कंपन्यांना अद्याप आयटी हार्डवेअर पीएलआय योजनेंतर्गत मान्यता मिळालेली नाही, त्यांचे मूल्यांकन केले जात आहे. लवकरच या कंपन्यांचा या योजनेत समावेश होईल, अशी अपेक्षा आहे.

सरकारने मे महिन्यात आयटी हार्डवेअर पीएलआय योजना सुरू केली होती, ज्यासाठी 17 हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. या योजनेअंतर्गत, लॅपटॉप, सर्व्हर आणि अल्ट्रा-स्मॉल फॉर्म फॅक्टर उपकरणांच्या देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन दिले जाणार आहे.

यामुळे 3.5 लाख कोटी रुपयांचे उत्पादन सुरू होईल आणि 2 लाख रोजगाराच्या संधी निर्माण होतील असा अंदाज आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, उद्योगाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत, जागतिक स्तरावर भारताची वेगळी ओळख निर्माण करणे हा यामागचा उद्देश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT