29,273 bogus firms, GST evasion of Rs 44,015 crore detected since May 23  Sakal
Personal Finance

Tax Evasion: 29,273 बनावट कंपन्यांनी केली 44,000 कोटी रुपयांची करचोरी; 121 जणांना अटक

राहुल शेळके

Tax Evasion: जीएसटी अधिकाऱ्यांनी मे 2023 पासून सुरू केलेल्या करचुकवेगिरी विरोधातील तपास मोहिमेत 44,015 कोटी रुपयांची जीएसटी चोरी आढळून आली आहे. याशिवाय देशभरात एकूण 29,273 बनावट कंपन्याही आढळून आल्या आहेत. त्याचबरोबर करचुकवेगिरीच्या प्रकरणात 121 जणांना अटक करण्यात आली आहे.

वित्त मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत 4,153 बनावट कंपन्या आढळून आल्या, या कंपन्यांनी सुमारे 12,036 कोटी रुपयांची करचोरी केली आहे. केंद्रीय जीएसटी अधिकाऱ्यांनी यापैकी 2,358 बनावट कंपन्यांचा शोध घेतला. त्यापैकी सर्वाधिक 926 कंपन्या महाराष्ट्रात, त्यानंतर राजस्थानमध्ये 507, दिल्लीत 483 आणि हरियाणामध्ये अशा 424 कंपन्या आढळून आल्या.

मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणांमध्ये 41 जणांना अटक करण्यात आली आहे. यापैकी 31 जणांना केंद्रीय जीएसटी अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत या मोहिमेमुळे 1,317 कोटी रुपयांचा महसूल वाचवण्यात यश आले आहे. त्यापैकी 319 कोटी रुपये वसूल करण्यात आले.

मंत्रालयाने सांगितले की, सरकारने जीएसटी नोंदणी प्रक्रिया सुरक्षित करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ किंवा CBIC बोर्ड देशभरात अस्तित्वात नसलेल्या/बनावट नोंदणी करणाऱ्यांविरुद्ध मोहीम राबवत आहे.

जीएसटीमधील फसवणुकीला आळा घालण्यासाठी याचा वापर केला जात आहे. काही बनावट कंपन्या वस्तू आणि सेवांचा मूलभूत पुरवठा न करता बनावट पावत्या जारी करून कर चुकवताना आढळून आल्या आहेत.

दिल्लीत सर्वाधिक करचोरी, महाराष्ट्रात सर्वाधिक बनावट कंपन्या

वित्त मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, डिसेंबरच्या तिमाहीत, महाराष्ट्रातील 926 शेल कंपन्यांनी 2,201 कोटी रुपयांचा कर चुकवला आहे. या कारवाईदरम्यान 11 जणांना अटक करण्यात आली. दिल्लीतील 483 बनावट कंपन्यांनी 3,028 कोटी रुपयांची करचोरी केल्याचा संशय आहे. येथेही 11 जणांना अटक करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Economy : भारत २०३१ पर्यंत तिसरी अर्थव्यवस्था; ‘एस अँड पी’चा अहवाल

IND vs BAN 1st Test : मानलं अण्णा! R Ashwin च्या दमदार खेळीने भारताला सावरले, पण आज गणित गंडले, ऑल आऊट झाले

युद्धाच्या नव्या टप्प्याला सुरुवात,इस्राईलचा इशारा; लेबनॉनच्या सीमेवर सैन्याची जुळवाजुळव

१२ चौकार, ३ षटकार! Sanju Samson चे खणखणीत शतक; श्रेयस अय्यरच्या संघाला सावरले

Latest Marathi News Updates : राष्ट्रवादी काँग्रेसची शरद पवार यांच्या नेतृत्वात महत्वाची बैठक

SCROLL FOR NEXT