Sangli GST Collection Sakal
Personal Finance

Sangli GST Collection : सांगली जिल्ह्याच्या जीएसटीच्या संकलनात ३० टक्के वाढ; मे महिन्यात १३६ कोटी रुपये कर वसुली

देशाचा जीएसटी संकलनाचा विचार केला तर मे महिन्यात जीएसटीचा एकूण महसूल एक कोटी ७२ लाख ७३९ कोटी झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Sangli News : गतवर्षीच्या मे महिन्यातील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलनात यंदाच्या वर्षी तब्बल ३० टक्के वाढ झाली आहे. गतवर्षीच्या मे महिन्यात १०५ कोटी रुपये जीएसटी संकलन झाले होते. तर यावर्षी १३६ कोटी रुपये कर गोळा झाला आहे. महाराष्ट्र आणि देशाच्या तुलनेत ही वाढ जास्त आहे.

गत आर्थिक वर्षातील एकूण १२४३ कोटी रुपये जीएसटी महसूल वसूल झाला होता. प्रत्येक महिन्यात शंभर कोटी जीएसटी संकलित झाला होता. तोच ट्रेंड एप्रिलपासून सुरू झालेल्या नवीन आर्थिक वर्षातही सुरू राहिला आहे. नवीन आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या महिन्यातही भरीव जीएसटी वसुली असून मे २४ मध्ये १३६ कोटींचे संकलन झाले आहे.

देशाचा जीएसटी संकलनाचा विचार केला तर मे महिन्यात जीएसटीचा एकूण महसूल एक कोटी ७२ लाख ७३९ कोटी झाला आहे. गेल्या वर्षीच्या मे २३ च्या एक कोटी ५७ लाख ९० कोटी महसुलाच्या तुलनेत १० टक्केपेक्षा जादा कर संकलन यंदा झाले.

महाराष्ट्रात मे २४ मध्ये जीएसटीचा एकूण महसूल २३ हजार ८५४ कोटी रुपये आहे. गेल्या वर्षीच्या मे २३ च्या २३ हजार ५३६ कोटी रुपये महसुलाच्या तुलनेत १४ टक्क्यांपेक्षा जादा कर संकलन या महिन्यात झाले.

मात्र, देशाच्या आणि राज्याच्या तुलनेत जिल्ह्याचा कर संकलनाचे प्रमाण जास्त आहे. जिल्ह्यात महसुलात वाहनांचे सुटे भाग, साखर, मोलासिस, इथेनॉल, सोने-चांदी दागिने, बेदाणे, दुग्धजन्य पदार्थ आदी वस्तू तर बिल्डर्स, रस्ते, विद्युत व जलसिंचन ठेकेदार, शीतगृहे, कमिशन एजंट आदी सेवा यांच्या पुरवठादारांचा मोठा सहभाग कर महसुलात दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT