5G Spectrum Auction
5G Spectrum Auction Sakal
Personal Finance

5G Spectrum: भारती एअरटेल बोली लावणारी सर्वात मोठी कंपनी, सरकारला मिळाले इतके हजार कोटी

राहुल शेळके

5G Spectrum Auction: मोबाईल सेवांसाठी वापरल्या जाणाऱ्या स्पेक्ट्रमचा लिलाव जवळपास 11,000 कोटी रुपयांच्या बोलीसह संपला. सरकारने या लिलावात 800 MHz, 900 MHz, 1800 MHz, 2100 MHz, 2300 MHz, 2500 MHz, 3300 MHz आणि 26 GHz स्पेक्ट्रम बँड ऑफर केले, ज्याची मूळ किंमत 96,238 कोटी रुपये आहे. अहवालानुसार सकाळच्या सत्रात कोणतीही नवीन बोली आली नाही. सुमारे 11,340 कोटी रुपयांच्या बोलीसह लिलाव संपला आहे.

स्पेक्ट्रम लिलावाच्या पहिल्या दिवशी 25 जूनलाही प्रतिसाद कमी होता आणि लिलावाच्या 5 फेऱ्यांमध्ये सुमारे 11,000 कोटी रुपयांच्या बोली लावल्या गेल्या. या लिलावात रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया सहभागी झाले होते.

याद्वारे, दूरसंचार कंपन्या हाय-स्पीड 5G सेवा देण्यासाठी स्पेक्ट्रम घेण्याचा प्रयत्न करत आहेत. रिलायन्स जिओने स्पेक्ट्रम लिलावासाठी सर्वाधिक 3,000 कोटी रुपये जमा केले. भारती एअरटेलने 1,050 कोटी रुपये जमा केले आणि व्होडाफोन आयडिया (VIL) ने 300 कोटी रुपये आगाऊ जमा केले.

लिलावाच्या पहिल्या दिवशी दूरसंचार विभागाने जारी केलेल्या अहवालानुसार, प्रामुख्याने 900 आणि 1,800 मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रम बँडमध्ये बोली लावण्यात आली आहे. याशिवाय 3 सर्कलमध्ये 2,100 मेगाहर्ट्झ बँडसाठीही बोली लावण्यात आली होती.

भारती एअरटेल ही सर्वात मोठी बोली लावणारी कंपनी आहे

या लिलावात भारती एअरटेल सर्वात मोठी बोली लावणारी कंपनी म्हणून समोर आली आहे. भारती एअरटेलचा स्पेक्ट्रम 6 सर्कलमध्ये संपत आहे, तर व्होडाफोन आयडियाचा स्पेक्ट्रम 2 सर्कलमध्ये संपत आहे. 2010 मध्ये स्पेक्ट्रम विक्री प्रक्रिया ऑनलाइन सुरू झाल्यापासूनचा हा 10वा लिलाव आहे. शेवटचा लिलाव 2022 मध्ये झाला होता जो 7 दिवस चालला होता. त्यात, 1.5 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या 5G टेलिकॉम स्पेक्ट्रमची विक्रमी विक्री झाली.

गेल्या वेळी लिलाव 7 दिवस चालला होता

शेवटचा लिलाव 2022 मध्ये झाला होता जो सात दिवस चालला होता. 5G टेलिकॉम स्पेक्ट्रमची रु. 1.5 लाख कोटींहून अधिक विक्रमी विक्री झाली, ज्यामध्ये मुकेश अंबानीनी 88,078 कोटी रुपयांची बोली लावली होती. त्यावेळी सुनील मित्तल यांच्या भारती एअरटेलने 43,084 कोटी रुपयांची बोली लावली होती, तर व्होडाफोन-आयडियाने 18,799 कोटी रुपयांना स्पेक्ट्रम विकत घेतला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET-UG Counselling: नीट-यूजी प्रकरणात मोठी अपडेट; पुढील नोटिसीपर्यंत काऊन्सलिंग स्थगित

Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारतीय संघ पाकिस्तानला जाणार? मोठी अपडेट आली समोर

Lek Ladaki Yojana : ‘दादा लाडका दाजीले बी काहीतरी द्या’; ‘लाडकी बहिण’ वरून सोशल मीडियात रंजक रिल्स

Maharashtra Live News Updates : हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणातील मुख्य आरोपीला लवकरच न्यायालयात हजर करणार

Veg Thali Price: सर्वसामान्यांना महागाईचा फटका; शाकाहारी थाळीच्या किमतीत 10 टक्क्यांनी वाढ, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT