601 crore IPO of Popular Vehicles and Services starting today are you ready Sakal
Personal Finance

Popular Vehicles & Services IPO : पॉप्युलर व्हेहिकल्स अँड सर्व्हिसेसचा 601 कोटीचा आयपीओ आजपासून सुरु, तुम्ही तयार आहात का ?

सकाळ वृत्तसेवा

Popular Vehicles & Services IPO : पॉप्युलर व्हेहिकल्स अँड सर्व्हिसेसचा (Popular Vehicles & Services) आयपीओ आजपासून सुरु झाला आहे. गुंतवणूकदारांना 14 मार्चपर्यंत यामध्ये गुंतवणूक करण्याची संधी असेल. या आयपीओच्या माध्यमातून 601 कोटी उभारण्याचा कंपनीचा मानस आहे.

यासाठी 280 रुपये ते 295 रुपये प्रति शेअर प्राइस बँड निश्चित करण्यात आला आहे. आयपीओअंतर्गत 250 कोटीचे ताजे इक्विटी शेअर्स जारी केले जातील. याशिवाय 351.55 कोटीचे शेअर्स ऑफर फॉर सेल (OFS) अंतर्गत विकले जातील. कंपनीचे शेअर्स बीएसई आणि एनएसईवर लिस्ट केले जातील.

ओएफएसचा भाग म्हणून, 1.19 कोटी इक्विटी शेअर्स खासगी इक्विटी फंड बनियन ट्री ग्रोथ कॅपिटल II एलएलसीद्वारे विकले जातील. कंपनीचा 69.45 टक्के हिस्सा प्रमोटर्सकडे आहे आणि बाकी हिस्सेदारी सार्वजनिक शेयरहोल्डर्सकडे आहे, ज्यात बनियन ट्रीचा समावेश आहे. बनियन ट्री कंपनीतील सर्वात मोठा शेयरहोल्डर आहे. कंपनीचे प्रमोटर जॉन के पॉल, फ्रान्सिस के पॉल आणि नवीन फिलिप यांच्याकडे 23.15 टक्के हिस्सा आहे.

गुंतवणूकदार किमान 50 इक्विटी शेअर्स आणि त्याच्या पटीत बोली लावू शकतात. यामध्ये रिटेल गुंतवणूकदारांना किमान 14 हजार 750 रुपये गुंतवावे लागतील. कंपनीच्या शेअर्सची संभाव्य लिस्टिंग तारीख 19 मार्च 2024 आहे.

ऑटोमोबाईल डीलरने त्याच्या काही उपकंपन्यांचे कर्ज फेडण्यासाठी 192 कोटी वापरण्याची योजना आखली आहे. बाकी निधी सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी वापरला जाईल. आयसीआयसीआय सिक्युरिटीज, नुवामा वेल्थ मॅनेजमेंट आणि सेंट्रम कॅपिटल हे बुक-रनिंग लीड मॅनेजर आहेत, तर लिंक इनटाइम इंडिया इश्यूचे रजिस्ट्रार आहेत.

पॉप्युलर व्हेहिकल्स अँड सर्व्हिसेसची स्थापना 1983 मध्ये करण्यात आली. कंपनी नवीन वाहन विक्री, वाहनांची सर्व्हिसिंग आणि दुरुस्ती, स्पेअर पार्ट्स आणि ॲक्सेसरीजचे डिस्ट्रीब्यूशन, पूर्व-मालकीच्या वाहनांची विक्री आणि एक्सचेंजची सुविधा शिवाय ड्रायव्हिंग स्कूलचे ऑपरेशन यांचा समावेश आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

Third Front In Maharashtra: विधानसभा निवडणुकीसाठी आता तिसराही पर्याय! बच्चू कडू, संभाजीराजे, राजू शेट्टी आले एकत्र

Waqf Board JPC Meeting: 'वक्फ बोर्ड'संबंधीच्या 'जेपीसी'त मोठी खडाजंगी; मेधा कुलकर्णी 'आप'च्या खासदारावर संतापल्या; नेमकं काय घडलं?

Ravindra Jadeja: मांजरेकरांनी पुन्हा जडेजाच्या बॅटिंगवर केली पोस्ट, यावेळी काय म्हटलंय? वाचा

Latest Marathi News Live Updates : लाडकी बहीण योजनेसाठी गडबड करु नका- मुख्यमंत्री

SCROLL FOR NEXT