RNFI Services IPO Sakal
Personal Finance

RNFI Services IPO : 70 कोटीचा आरएनएफआय सर्व्हिसेसचा आयपीओ आजपासून खुला,डिटेल्स जाणून घ्या...

सकाळ वृत्तसेवा

आरएनएफआय सर्व्हिसेसचा (RNFI Services) आयपीओ आजपासून अर्थात 22 जुलैपासून सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला आहे. या आयपीओमध्ये 24 जुलै 2024 पर्यंत गुंतवणूक करता येईल. RNFI सर्व्हिसेस कंपनीला या आयपीओद्वारे 70 कोटी उभे करायचे आहेत. याद्वारे कंपनी 67.44 लाख नवीन शेअर्स जारी करणार आहे.

आयपीओसाठीचा प्राइस बँड 98 ते 105 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला आहे. आयपीओची लॉट साइज 1200 शेअर्स आहे. किरकोळ गुंतवणूकदारांना या आयपीओमध्ये किमान 1 लाख 26 हजार गुंतवावे लागतील.

तर गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी, लॉटची साईज दोन लॉट आहे, ज्यासाठी त्यांना 2 लाख 52 हजार गुंतवावे लागतील. 25 जुलै 2024 रोजी गुरुवारी आरएनएफआय सर्व्हिसेस आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना शेअर्स ऍलॉट केले जातील. तर 26 जुलै 2024 रोजी रिफंड दिला जाईल.

RNFI सर्व्हिसेस आयपीओने 19 जुलै 2024 रोजी अँकर गुंतवणूकदारांकडून 20.03 कोटी उभारले आहेत. चॉइस कॅपिटल ॲडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड ही RNFI सर्व्हिसेस आयपीओचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहे. स्कायलाइन फायनान्शिअल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या इश्यूचे रजिस्ट्रार आहेत. RNFI सर्व्हिसेस आयपीओसाठी मार्केट मेकर चॉईस इक्विटी ब्रोकिंग आहे.

RNFI सर्व्हिसेस आयपीओची लिस्टींग एनएसई आणि एसएमईवर होईल. सोमवार, 29 जुलै, 2024 ही त्याची लिस्टींगसाठीची तारीख निश्चित करण्यात आली आहे. एकूण ऑफरपैकी 50% पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी, 35% किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आणि 15% गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे.

RNFI सर्व्हिसेस आयपीओ हा एसएमई आयपीओ आहे आणि या कंपनीच्या शेअर्सची फेस व्हॅल्यू 10 प्रति शेअर निश्चित केली आहे. RNFI सर्व्हिसेस आयपीओमध्ये ऑफर फॉर सेल अंतर्गत कोणतीही ऑफर असणार नाही.

RNFI सर्व्हिसेस लिमिटेडची स्थापना 2015 मध्ये झाली. ही एक आर्थिक तंत्रज्ञान फर्म आहे जी तिच्या ऑनलाइन पोर्टल आणि मोबाइल ऍप्लीकेशनद्वारे b2b आणि b2b2c सोल्यूशन्स देते. ही कंपनी संपूर्ण भारतात बँकिंग, डिजिटल आणि सरकारी g2c सर्व्हिसेस देते.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT