Gautam Adani Big Deal: गौतम अदानी यांच्यासाठी 2024ची सुरुवात चांगली झाली आहे. 2024 मधील पहिली मोठी खरेदी केली त्यांनी केली आहे. अदानी समूहाच्या सिमेंट क्षेत्रातील ACC लिमिटेडने ACCPL नावाच्या कंपनीचे अधिग्रहण पूर्ण केले आहे.
बिझनेस स्टँडर्डच्या अहवालानुसार, सोमवारी 8 जानेवारी रोजी अदानी समूहाची कंपनी ACC लिमिटेडने Asian Concretes and Cements Private Limited (ACCPL) चे अधिग्रहण पूर्ण केले. सिमेंट क्षेत्रात अदानी समूहाचे वर्चस्व वाढवणारा हा करार एकूण 775 कोटी रुपयांना पूर्ण झाला आहे. नवीन वर्षात अदानी समूहाच्या या पहिल्या मोठ्या डीलचा परिणाम कंपनीच्या शेअर्सवर दिसून येत आहे.
ACC लिमिटेड ही अदानी समूहाच्या सिमेंट फर्म अंबुजा सिमेंटची उपकंपनी आहे आणि तिची ACCPLमध्ये आधीच 45 टक्के भागीदारी होती. आता कंपनीने आपल्या विद्यमान प्रवर्तकांकडून उर्वरित 55 टक्के भागभांडवल देखील विकत घेतले आहे आणि त्यानंतर ACCPL ची संपूर्ण मालकी ACC कडे आली आहे. या 55 टक्के भागभांडवल खरेदीची किंमत 425.96 कोटी रुपये आहे.
ACCPL कंपनी हिमाचल प्रदेशातील नालागढ येथे 1.3 MTPA सिमेंट क्षमता आहे. त्याची उपकंपनी Asian Fine Cements Private Limited (AFCPL) ची राजपुरा, पंजाब येथे 1.5 MTPA सिमेंट क्षमता आहे. या संपादनानंतर आता एसीसी लिमिटेडची सिमेंट क्षमता वाढण्यास मदत होणार आहे.
ACC ची आज 8 जानेवारी रोजी बोर्डाची बैठक झाली आणि 425.96 कोटी रुपयांमध्ये उर्वरित 55 टक्के स्टेकसाठी एशियन काँक्रीट आणि सिमेंट्ससोबत करार करण्याचा निर्णय घेण्यात आला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.