accident insurance on debit card health finance management Sakal
Personal Finance

डेबिट कार्डवरही अपघात विमा

क्रेडीट कार्डधारकास कार्डासोबत अपघातविमा मिळतो याची बहुतेकांना महिती असल्याचे दिसते, परंतु डेबिट कार्डसाठीही ही सुविधा असते याबाबत अनेकजण अनभिज्ञ असल्याचे दिसून येते.

सकाळ वृत्तसेवा

क्रेडीट कार्डधारकास कार्डासोबत अपघातविमा मिळतो याची बहुतेकांना महिती असल्याचे दिसते, परंतु डेबिट कार्डसाठीही ही सुविधा असते याबाबत अनेकजण अनभिज्ञ असल्याचे दिसून येते. डेबिट कार्डधारकांनीदेखील या सुविधेचा लाभ घेण्यासाठी त्याबाबत अधिक माहिती जाणून घेणे गरजेचे आहे.

कार्ड प्रकारानुसार विमा

आता बहुताश सर्व बँका आपल्या ग्राहकांना पेमेंट सुविधेसाठी डेबिट किंवा एटीएम कार्ड देतात. या कार्डचा वापर करून ग्राहक एटीएम मशीनमधून ठराविक रकमेपर्यंत रोख रक्कम काढू शकतात; तसेच ऑनलाइन किंवा प्रत्यक्ष दुकानात, मॉलमध्ये केलेल्या खरेदीचे पेमेंट करू शकतात.

या डेबिट कार्डांचे विविध प्रकार (गोल्ड, सिल्व्हर, प्रीमियम, सिग्नेचर आदी) असतात. यातील बेसिक कार्ड वगळता बहुतेक सर्व डेबिट कार्डांसोबत कार्डधारकास अपघात विमा सुरक्षा दिलेली असते. या विम्याची रक्कम कार्डचा प्रकार व बँकेनुसार कमी अधिक असते; तसेच यात विमान प्रवासात होणारा मृत्यू (एअर डेथ) व अन्य अपघाताने होणारा मृत्यू (नॉन एअर डेथ) अशा दोन वेगळ्या प्रकारांसाठी विमा असतो.

उदा. स्टेट बँक मास्टर किंवा व्हिसा सिग्नेचर डेबिट कार्डधारकास विमान प्रवासात होणाऱ्या मृत्यूसाठी (एअर डेथ) २० लाख रुपयांचा विमा मिळतो, तर अन्य अपघाताने होणाऱ्या मृत्यू (नॉन एअर डेथ) १० लाख रुपयांचा विमा मिळतो.

कोटक बँकेच्या सिग्नेचर डेबिट कार्डची ही मर्यादा एअर डेथसाठी एक कोटी रुपये असून, नॉन एअर डेथसाठी १५ लाख रुपये आहे. अशाप्रकारे बँकेनुसार व डेबिट कार्डच्या प्रकारानुसार विमा रक्कम कमी-अधिक असू शकते हे लक्षात घेऊन, त्यानुसार बँक व कार्ड निवडणे आवश्यक असते. अपघाती विमा सुरक्षा विनामूल्य असते.

व्यवहारमर्यादेची अट

यासाठी स्वतंत्र विमापॉलिसी दिली जात नाही; तसेच दावा पात्र होण्यासाठी संबंधित डेबिट कार्डधारकाच्या अपघाती मृत्यूच्या आधी व मृत्यू तारखेच्या आधी काही दिवस काही किमान व्यवहार झालेले असणे गरजेचे आहे.

किती व्यवहार आणि किती आधी असावेत, याबाबतचे नियमही बँकेनुसार वेगवेगळे असतात. उदा. एचडीएफसी डेबिट कार्डबाबत किमान एक व्यवहार व तोही मृत्यू तारखेच्या ३० दिवस आधीपर्यंत मयत कार्डधारकाकडून झाला असला पाहिजे, तर कोटक बँकेच्या बाबतीत, किमान ५०० रुपयांचे दोन व्यवहार मयताकडून ३० दिवस आधीपर्यंत झालेले असले पाहिजेत, तर डीबीएस बँकेच्या बाबतीत किमान एक व्यवहार ९० दिवस आधीपर्यंत झाला असला पाहिजे.

यूपीआय अॅपला डेबिट कार्ड संलग्न करून झालेले व्यवहार यासाठी ग्राह्य धरले जात नाहीत, तर फक्त ऑनलाइन खरेदी करताना डेबिट कार्ड वापरून झालेले पेमेंट; तसेच दुकानात किंवा मॉलमध्ये खरेदी करताना डेबिट कार्ड वापरून झालेले पेमेंट यासाठी ग्राह्य धरले जाते.

दावा प्रक्रिया

दावा मंजूर होण्यासाठी कार्डधारकाचा कायदेशीर वारस किंवा नॉमिनी यांनी संबंधित बँकेचा क्लेम फॉर्म भरून आवश्यक त्या कागदपत्रांसहित बँकेकडे द्यावा लागतो. सर्वसाधारणपणे कार्डधारकाच्या डेबिट कार्डचा तपशील, शक्य असल्यास डेबिट कार्ड, मृत्यू दाखल्याची मूळ प्रत, अपघात ठिकाणी झालेल्या पंचनाम्याची प्रत, ‘एफआयआर’ची प्रत, अपघाती मृत्यू असल्याचे डॉक्टर किंवा हॉस्पिटलचे प्रमाणपत्र,

स्वत: वाहन चालवत असताना अपघाती मृत्यू झाला असल्यास मयताचे ड्रायव्हिंग लायसन्स अशी सर्व कागदपत्रे जोडावी लागतात. याप्रमाणे सर्व पूर्तता केल्यानंतर संबंधित बँक डेबिट कार्डनुसार दावा रक्कम मंजूर करून, विम्याची रक्कम नॉमिनी किंवा वारसास दिली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT