Adani Electricity tops National Consumer Service Rating  Sakal
Personal Finance

Adani Electricity: अदाणीच नंबर वन! भारतातील ६२ वितरकांंमध्ये मिळाले पहिले स्थान

Adani Electricity: मुंबईतील सर्वात मोठी वीज वितरक असलेल्या अदाणी इलेक्ट्रिसिटीने केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या २०२३च्या ग्राहक सेवा मानांकनात पुन्हा एकदा ‘अ’ मानांकन मिळवले आहे. भारतातील ६२ वितरकांंमध्ये त्यांना हे पहिले स्थान मिळाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई: मुंबईतील सर्वात मोठी वीज वितरक असलेल्या अदाणी इलेक्ट्रिसिटीने केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या २०२३च्या ग्राहक सेवा मानांकनात पुन्हा एकदा ‘अ’ मानांकन मिळवले आहे. भारतातील ६२ वितरकांंमध्ये त्यांना हे पहिले स्थान मिळाले आहे. 

अहवालातील प्रमुख निष्कर्ष - अदाणीच्या ३१.५० लाख ग्राहकांच्या घरी कायम वीजपुरवठा सुरु असतो. वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण इतरांच्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी आहे. यात देशाची सरासरी २००.१५ असताना कंपनीचा निर्देशांक फक्त ०.२० आहे.  १०० टक्के अर्ज ऑनलाइन प्रक्रिया करून कंपनीची नवीन वीज जोडणी प्रक्रिया केली जाते.

या क्षेत्रातील राष्ट्रीय सरासरी ८२ टक्के आहे. पारदर्शकतेसाठी १०० टक्के देयके वास्तविक मीटर रीडिंगवर आधारित असतात, हे देखील राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे. 

ग्राहकांना सातत्याने विविध प्रकारची माहिती दिली जाते. ९४ टक्के ग्राहकांना बिलिंग अलर्ट मिळतो. जवळपास ८० टक्के ग्राहक डिजिटल पद्धतीने देयके भरतात. कॉल सेंटर तक्रारींसाठी ठरविलेल्या वेळेपेक्षा ८९ टक्के कमी वेळ घेऊन समस्यांचे त्वरित निराकरण केले जाते. 

या अहवालात अदाणी इलेक्ट्रिसिटीची औद्योगिक क्षेत्रातील सर्वोत्तम कार्यप्रणाली व तांत्रिक कौशल्य दिसते. हे यश म्हणजे अदाणी इलेक्ट्रिसिटीच्या स्पर्धात्मक दरांमधील विश्वासार्हता, शाश्वत आणि ग्राहक-केंद्रित वीज सेवा यांना  मिळालेली पावती आहे, अशी प्रतिक्रिया अदाणी इलेक्ट्रिसिटीच्या प्रवक्त्याने व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: "भाजपचा नोट जिहाद सुरु"; विनोद तावडे प्रकरणावर ठाकरेंची कडवी प्रतिक्रिया

Virar : क्षितीज ठाकूर यांनी दाखविलेल्या डायऱ्यांमध्ये नेमके काय? नावांपुढे लिहिले...

Chandrakant Tingare: माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांचे पती चंद्रकांत टिंगरेंवर हल्ला! पुण्यातील वडगावशेरीत घडली घटना

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'नंतर निर्मात्यांनी केली नव्या सिनेमाची घोषणा ! 'या' कलाकारांच्या मुख्य भूमिका

Latest Marathi News Updates : विनोद तावडे यांच्या पत्रकार परिषदेला थोडाचवेळात सुरुवात होणार

SCROLL FOR NEXT