Adani Group: पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या दुर्गम भागात, अदानी समूहाने गुजरातमधील खावडा भागात जगातील सर्वात मोठे अक्षय ऊर्जा पार्क तयार केले आहे. अदानी ग्रीन एनर्जीने 30 मेगावॅट वीज निर्मितीसाठी अंदाजे 1.5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
व्यवस्थापकीय संचालक विनीत जैन म्हणाले की “आम्ही खावडामध्ये 2,000 मेगावॅट वीजनिर्मिती सुरू केली आहे आणि मार्च 2025 मध्ये 4 GW आणि त्यानंतर दरवर्षी 5 GW वीजनिर्मिती करण्याची योजना आहे,”.
विनीत जै म्हणाले की, खावडा येथे 81 अब्ज युनिट्सचे उत्पादन तयार केले जाणार आहे, जे बेल्जियम, चिली आणि स्वित्झर्लंड सारख्या देशांना ऊर्जा देऊ शकेल.
खावडा येथे एक हवाई पट्टी देखील आहे जी आठवड्यातून काही वेळा कंपनीच्या अधिका-यांना मुंद्रा किंवा अहमदाबाद येथे आणण्यासाठी वापरली जाते. अत्यंत खारट पाण्याच्या या भागात अनेक आव्हाने आहेत.
मार्च ते जून या काळात धुळीची वादळे येतात, दळणवळण आणि वाहतूकीच्या पायाभूत सुविधा नाहीत, सर्वात जवळचे राहण्यायोग्य ठिकाण सुमारे 80 किलोमीटर अंतरावर आहे. पावसाळ्यात जमिनीखाली पाणी मुरत नाही. या आव्हानांना न जुमानता, अदानी समूह आपल्या अक्षय ऊर्जा योजनांबाबत खूप महत्त्वाकांक्षी आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की खावडा गावातील काही मजुरांसाठी 8,000 घरे बांधली जात आहेत. हा प्रकल्प पूर्णपणे वॉटरलेस रोबोटिक मॉड्यूल क्लिनिंग सिस्टमने कव्हर केला जाईल. खावडा मधील जमीन सरकारची असून, त्यांनी ही जागा अदानी समूहाला 40 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर दिली आहे.
खारट मातीमुळे, तेथे कोणतीही झाडे नव्हती. ही जमीन कोणत्याही पिकासाठी सुपीक नसली तरी सौरऊर्जेसाठी ती खूप 'सुपीक' आहे. लडाखनंतर देशातील दुसरा सर्वात चांगला सौर प्रकल्प आहे.
हवाई पट्टीपासून 18 किलोमीटर अंतरावर अदानी समूहाचे खवडा रिन्युएबल पार्क आहे, जे 538 चौरस किलोमीटर (पॅरिसच्या आकाराच्या सुमारे पाचपट) पसरलेले आहे. एनर्जी पार्कची बाहेरची किनार पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय सीमेपासून फक्त एक किमी अंतरावर आहे. एक किलोमीटरच्या क्षेत्रात बीएसएफचे नियंत्रण आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.