Adani Defence: अदानी डिफेन्स अँड एरोस्पेसतर्फे कानपूरमध्ये दारूगोळा आणि क्षेपणास्त्रांच्या निर्मिती करणाऱ्या कॉम्प्लेक्सचे उद्घाटन करण्यात आले. कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 500 एकरमध्ये पसरलेले हे कॉम्प्लेक्स दक्षिण आशियातील सर्वात मोठे असेल. (Adani Defence launches South Asia’s largest ammunition, missiles facilities in Kanpur)
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी योगी आदित्यनाथ म्हणाले, 'ही सुविधा पंतप्रधान मोदींच्या स्वावलंबी भारत मोहिमेच्या यशाचा पुरावा आहे आणि उत्तर प्रदेश औद्योगिक शक्तीस्थान बनले आहे.
या प्रसंगी APSEZ चे MD करण अदानी म्हणाले की, या प्रकल्पाचा प्रभाव केवळ संरक्षणापुरता मर्यादित नाही तर तो खूप पुढे होणार आहे. याची सुरुवात 1500 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीने होत आहे, जी पुढील 5 वर्षांत 3000 कोटी रुपयांपर्यंत वाढवली जाईल.
या प्रकल्पामुळे चार हजार लोकांना थेट रोजगार उपलब्ध होणार आहे. त्याचा परिणाम एमएसएमई आणि स्थानिक परिसंस्थेवरही दिसून येईल. या कॉम्प्लेक्समध्ये सौर ऊर्जा आणि कचरा व्यवस्थापन यांसारख्या तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल.
करण अदानी यांनी सांगितले की या कॉम्प्लेक्समध्ये सशस्त्र दल, निमलष्करी दल आणि पोलिसांसाठी उच्च दर्जाचे लहान, मध्यम आणि मोठ्या आकाराचा दारुगोळा तयार केला जाईल. ते म्हणाले की या सुविधेने लहान कॅलिबर दारुगोळ्याचे उत्पादन सुरू केले आहे, जे भारताच्या वार्षिक गरजेच्या 25% असेल.
या संरक्षण संकुलाची घोषणा अदानी समूहाने 2022 मध्ये उत्तर प्रदेश गुंतवणूकदार समिट दरम्यान केली होती. दोन वर्षांत या संकुलाचे काम सुरू झाले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.