Adani Group News  sakal
Personal Finance

Adani Group News : १.२ लाख कोटींची गुंतवणूक ; अदानी समूहाकडून वेगाने वाढणाऱ्या क्षेत्रावर भर

अदानी समूहाने आपला व्यवसाय विस्तार करण्याची योजना आखली आहे. त्यानुसार येत्या आर्थिक वर्षात १.२ लाख कोटींहून अधिक गुंतवणूक केली जाणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : अदानी समूहाने आपला व्यवसाय विस्तार करण्याची योजना आखली आहे. त्यानुसार येत्या आर्थिक वर्षात १.२ लाख कोटींहून अधिक गुंतवणूक केली जाणार आहे. ही गुंतवणूक वेगाने वाढणारे क्षेत्र जसे की, विमानतळ व्यवसाय, ऊर्जा, बंदरे, कमोडिटी, सिमेंट आणि मीडिया या क्षेत्रात केली जाणार आहे.

पीटीआयच्या माहितीनुसार अदानी समूह आगामी सात ते दहा वर्षांत आपल्या विविध क्षेत्रातील व्यवसायाच्या विस्तारावर भर देणार आहे. त्यासाठी विविध व्यवसायातील आपली गुंतवणूक दुप्पट करून १०० अब्ज डॉलर (सुमारे ८.२९ लाख कोटी) करणार आहे. त्याचवेळी आगामी आर्थिक वर्ष २०२४-२५साठीचा भांडवली खर्च गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ४० टक्क्यांनी अधिक आहे. यामध्ये ७० टक्के भांडवल हे अक्षय ऊर्जा आणि ग्रीन हायड्रोजनवर खर्चले जाणार आहे. तर ३० टक्के भांडवल विमानतळ आणि बंदर व्यवसायावर खर्चले जाणार आहे.

यापूर्वी, अदानी समूहाने १०० अब्ज डॉलर भांडवली खर्चाची घोषणा केली होती. यातील बहुतांश गुंतवणूक वेगाने वाढणाऱ्या व्यवसायांमध्ये केली जाणार असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले होते. त्यानुसार वेगाने वाढणारे क्षेत्र जसे की अक्षय ऊर्जा, ग्रीन हायड्रोजन, विमानतळ आणि बंदरे यामध्येही गुंतवणूक केली जात आहे.

जगातील सर्वात मोठे रिन्युएबल पार्क

अदानी समूह गुजरातमधील खवडा येथे जगातील सर्वात मोठे रिन्युएबल पार्क बनवत आहे. हे पार्क ५३० चौरस किलोमीटरमध्ये नियोजित आहे. दुसरीकडे अदानी समूह हा देशातील सर्वात मोठा विमानतळ ऑपरेटर आहे. त्यांच्याकडे जयपूर, अहमदाबाद, लखनऊ, गुवाहाटी, मुंबई, मंगळूर आणि तिरुअनंतपुरम अशा सात विमानतळांचे परिचालन आहे. त्यातच अदानी समूह ही जगातील दुसरी सर्वांत मोठी सौरऊर्जा कंपनी म्हणून पुढे येत आहे.

अदानी समूह विमानतळ व्यवसायात ६० हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. येत्या दहा वर्षांत पायाभूत सुविधांसह धावपट्टी, टॅक्सी वे, विमान पार्किंग स्टँड आणि टर्मिनलवर खर्च केला जाणार आहे. विमानतळ टर्मिनल आणि धावपट्टी क्षमतेसाठी ३० हजार कोटी आणि शहर विकासासाठी ३० हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे.

- करण अदानी, मुख्य कार्यकारी अधिकार, अदानी पोर्ट्‌स अँड सेझ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT