adani groups shares fall this time american investigation is being done know the matter Sakal
Personal Finance

Adani Group: अमेरिकन तपास यंत्रणांच्या रडारवर अदानी समूह; कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण, काय आहे प्रकरण?

Adani Group: हिंडेनबर्ग अहवालाचा फटका बसलेल्या गौतम अदानी यांच्या समोर आणखी एक नवी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळत आहे.

राहुल शेळके

Adani Group: हिंडेनबर्ग अहवालाचा फटका बसलेल्या गौतम अदानी यांच्या समोर आणखी एक नवीन संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळत आहे. खरे तर अमेरिकेतील सरकारी वकिलांनी अदानी समूहाबाबत तपासाची व्याप्ती वाढवली असून, त्याचा परिणाम समूहाच्या शेअर्सवर होताना दिसत आहे.

देशांतर्गत शेअर बाजारातील चढउतारांदरम्यान आज गौतम अदानी समूहाच्या बहुतांश कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. अदानी टोटल गॅस शेअर्स 3.30 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत होते तर NDTV शेअर्स सुमारे एक टक्क्यांनी घसरून 217 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होते.

अदानी समूहाचे शेअर्स घसरण्याचे कारण काय?

ब्लूमबर्गच्या म्हणण्यानुसार, अमेरिका अदानी समूहाचे संस्थापक गौतम अदानी आणि त्यांच्या कंपन्यांची लाचखोरीत सहभागी असल्याच्या संशयावरून चौकशी सुरु आहे.

ऊर्जा प्रकल्पासाठी अधिकाऱ्यांना लाच देण्यात अदानी ग्रुप किंवा गौतम अदानी यांच्यासह कंपनीशी संबंधित लोकांचा सहभाग होता का, याचा तपास सुरु आहे. यूएस कायद्यानुसार, तपास यंत्रणा परदेशी भ्रष्टाचाराच्या आरोपांचा पाठपुरावा करत आहेत.

अदानी समूहाच्या शेअर्सची स्थिती

समूहाची मुख्य कंपनी अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडचे ​​शेअर्स आज दुपारी 1:30 वाजता 1.12 टक्क्यांनी घसरून 3,097.00 रुपयांवर व्यवहार करत होते. याशिवाय अदानी पॉवर 1.03 टक्के, अदानी टोटल गॅस 3.34 टक्के, अदानी ग्रीन एनर्जी 1.74 टक्के, अदानी पोर्ट्स 1.57 टक्के, अदानी विल्मार 1.73 टक्के आणि अदानी एनर्जी सोल्युशन्स 2.99 टक्क्यांनी घसरले.

काय आहे प्रकरण?

अहवालानुसार, अदानी समूहाची कंपनी किंवा गौतम अदानीसह कंपनीशी संबंधित इतर लोक भारतात ऊर्जा प्रकल्प मिळवण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना लाच देण्यात गुंतले होते का, याचा तपास यंत्रणा तपास करत आहेत.

अदानी समूहाने एका निवेदनात म्हटले आहे की, "आम्हाला आमच्या चेअरमनविरुद्ध कोणत्याही चौकशीची माहिती नाही." निवेदनात पुढे म्हटले आहे, "एक व्यावसायिक समूह म्हणून, आम्ही कॉर्पोरेट प्रशासनाच्या मानकांनुसार कार्य करतो. आम्ही भारत आणि इतर देशांमधील भ्रष्टाचार विरोधी आणि लाच विरोधी कायद्यांचे पूर्ण पालन करतो."

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

सोलापूर जिल्ह्यातील ११ आमदारांनी किती घेतली मते? दुसऱ्या- तिसऱ्या क्रमांकावर कोण? जाणून घ्या, जिल्ह्यातील विजयी अन्‌ दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची मते

Amol Javle Won Raver Assembly Election 2024 Result Live: रावेर विधानसभा मतदार संघातून अमोल जावळे विजयी

SCROLL FOR NEXT