Adani-Paytm Deal Sakal
Personal Finance

Adani-Paytm Deal: गौतम अदानी बनणार पेटीएमचे पार्टनर; फिनटेक क्षेत्रात प्रवेश करण्याच्या तयारीत

Adani Group-Paytm Deal: अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी हे Paytm ची मूळ कंपनी असलेल्या One 97 Communications मधील भागभांडवल विकत घेण्याच्या विचारात आहेत. पेटीएमचे संस्थापक आणि सीईओ विजय शेखर शर्मा यांनी मंगळवारी अहमदाबाद येथील त्यांच्या कार्यालयात अदानी यांची भेट घेतली.

राहुल शेळके

Adani Group-Paytm Deal: अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी हे Paytm ची मूळ कंपनी असलेल्या One 97 Communications मधील भागभांडवल विकत घेण्याच्या विचारात आहेत. पेटीएमचे संस्थापक आणि सीईओ विजय शेखर शर्मा यांनी मंगळवारी अहमदाबाद येथील त्यांच्या कार्यालयात अदानी यांची भेट घेतली.

जर हा व्यवहार यशस्वी झाला, तर हा पोर्ट-टू-एअरपोर्ट ग्रुप म्हणजेच अदानी ग्रुप फिनटेक क्षेत्रात प्रवेश करेल. त्यानंतर या सेगमेंटमध्ये अदानी ग्रुप गुगल पे, वॉलमार्टचा फोनपे आणि मुकेश अंबानीच्या जिओ फायनान्शियलशी स्पर्धा करेल. अंबुजा सिमेंट्स आणि एनडीटीव्ही खरेदी केल्यानंतर पेटीएम खरेदी करणे ही अदानी समूहासाठी महत्त्वाची डील ठरू शकते.

Paytm मध्ये विजय शेखर यांची किती हिस्सेदारी आहे?

टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, अदानी ग्रुप पेटीएममधील स्टेक खरेदी करू शकतो. त्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये कराराबाबत बैठकही झाली आहे. विजय शेखर शर्मा यांच्याकडे वन 97 मध्ये सुमारे 19 टक्के भागभांडवल आहे, ज्याचे मूल्य 4,218 कोटी रुपये आहे.

पेटीएममध्ये थेट 9 टक्के हिस्सा

शर्मा यांच्याकडे पेटीएमचा 9 टक्के हिस्सा आहे आणि त्यांच्याकडे परदेशी युनिट रेझिलिएंट ॲसेट मॅनेजमेंटद्वारे 10 टक्के हिस्सा आहे. One97 ने स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीनुसार, शर्मा आणि रेसिलियंट दोघेही सार्वजनिक भागधारक म्हणून लिस्ट आहेत.

सेबीचा नियम काय म्हणतो?

सेबीच्या नियमांनुसार, कंपनीमध्ये 25 टक्क्यांपेक्षा कमी हिस्सा असलेल्या खरेदीदाराला कंपनीतील किमान 26 टक्के हिश्यासाठी ओपन ऑफर द्यावी लागेल. खरेदीदार कंपनीच्या संपूर्ण शेअर कॅपिटलसाठी खुली ऑफर देखील देऊ शकतो.

कॅटॅलिस्ट ॲडव्हायझर्सचे कार्यकारी संचालक बिनॉय पारीख म्हणाले की, पेटीएम आर्थिक समस्यांचा सामना करत आहे. पेटीएमला अदानी समूहासोबतच्या करारामुळे या समस्यांवर मात करण्यास मदत होईल. हा करार अदानींसाठीही फायदेशीर ठरणार आहे. पेटीएमचे प्रस्थापित डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म अदानी समूहाला या क्षेत्रात उभारी घेण्यासाठी मदत करेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT