Adani Group Invest in Green Hydrozen: गौतम अदानी त्यांच्या ग्रीन हायड्रोजन प्रकल्पासाठी 4 अब्ज डॉलर्स म्हणजे 33 हजार कोटी रुपये गुंतवणूक करण्याचा विचार करत आहेत. यामुळे देशाला कमी खर्चात ग्रीन हायड्रोजन मिळेल आणि देशातील प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.
या प्रकरणी अद्याप अदानी समूहाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. फ्रान्सच्या टोटल एनर्जी एसई आणि अदानी ग्रुपने जूनमध्ये सांगितले होते की ते भारतात ग्रीन हायड्रोजन आणि संबंधित उत्पादनांचे उत्पादन करण्यासाठी 5 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची योजना आखत आहेत.
काय आहे गौतम अदानींची प्लॅन?
ब्लूमबर्गने सूत्रांचा हवाला देत माहिती दिली आहे की, ग्रीन हायड्रोजन प्रकल्प पुढे नेण्यासाठी अदानी समूहाने 4 बिलियन डॉलरची गुंतवणूक करण्याचा विचार केला आहे. ही रक्कम उभारण्याचे काम प्रामुख्याने अदानी न्यू इंडस्ट्रीजकडे सोपविण्यात आले आहे.
ही कंपनी स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय कर्जदारांशी संपर्क साधून गुंतवणूक वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही.
मोदी सरकारने आपले संपूर्ण लक्ष हरित ऊर्जा क्षेत्रावर केंद्रित केले आहे. जागतिक स्तरावर या क्षेत्रात भारत बाकीच्या देशांच्या तुलनेत खूप पुढे आहे, असे सरकारने म्हटले आहे. यामुळेच मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांनी ग्रीन एनर्जीवर लक्ष केंद्रित केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून अदानी समूहाच्या शेअर्सवर दबाव दिसून येत आहे. गेल्या 6 व्यापार सत्रांमध्ये गुंतवणूकदारांचे सुमारे 20 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. गौतम अदानींचा हा प्लॅन यशस्वी झाल्यास अदानी समूहाच्या शेअर्समध्ये वाढ होऊ शकते. ज्याचा एकूण शेअर बाजाराला फायदा होईल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.