Adani’s Mundra Port  Sakal
Personal Finance

Adani Port: भारतात पोहोचले सर्वात मोठे कंटेनर जहाज; 4 फुटबॉल मैदाना इतकी लांबी, अदानी समूहाने केला विक्रम

राहुल शेळके

Adani Port: देशातील सर्वात मोठी बंदर आणि लॉजिस्टिक कंपनी अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन (APSEZ) ने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. आतापर्यंतचे सर्वात मोठे कंटेनर जहाज 'MSC अण्णा' हाताळण्याचा हा विक्रम आहे.

देशाच्या उत्तर-पश्चिम किनारपट्टीवर असलेल्या APSEZ च्या प्रमुख बंदर 'मुंद्रा'ने आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या कंटेनर जहाजाचे स्वागत करून आणखी एक विक्रम केला आहे. अशी कामगिरी करणारे मुंद्रा बंदर हे देशातील पहिले बंदर ठरले. MSC अण्णा हे एक प्रभावी आणि विशाल जहाज आहे, ज्याची एकूण लांबी 399.98 मीटर आहे, जी अंदाजे 4 फुटबॉल मैदानांइतकी आहे.

मुंद्रा बंदर हे अरबी समुद्रावर वसलेले गुजरातमधील प्रमुख बंदर आहे. मुंद्रा बंदर अदानी समूहाच्या अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन (APSEZ) द्वारे संचालित आणि व्यवस्थापित केले जाते.

मुंद्रा बंदराने यापूर्वी जुलै 2023 मध्येही विक्रम केला होता. MSC हॅम्बर्ग हे 399 मीटर लांबीचे जहाज या बंदरावर आले होते. ज्याची क्षमता 16,652 TEU आहे. जगातील सर्वात मोठ्या कंटेनर जहाजांमध्येही त्याची गणना होते.

निवेदनानुसार, MSC अण्णाच्या मुक्कामादरम्यान अंदाजे 12,500 TEU मालाची देवाणघेवाण होणे अपेक्षित आहे. यावरून अदानी समूहाचे मुंद्रा बंदर मोठ्या प्रमाणावर मालवाहतूक करण्यास सक्षम आहे.

अदानी पोर्ट्सचे हे बंदर 35 हजार एकरांवर पसरले आहे. हे भारतातील सर्वात मोठे व्यावसायिक बंदर आहे, जे डीप-ड्राफ्ट क्षमतेने सुसज्ज आहे आणि सर्व हवामान परिस्थितीत काम करण्यास सक्षम आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

Maratha Reservation : आता वेळ वाढवून देणार नाही; मनोज जरांगे पाटील

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Vaman Mhatre यांच्या अडचणी वाढणार! FIR व्हायरल केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीडित मुलीच्या आईची मागणी

AFG vs SA 1st ODI : अफगाणिस्तानने इतिहास घडवला, दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला

SCROLL FOR NEXT