अदानी ग्रुपच्या एएमजी मीडिया नेटवर्क्स लिमिटेड या कंपनीने IANS इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये 50.50 टक्के भागिदारी मिळवली आहे. यामुळे आता AMG ही IANS ची सर्वात मोठी शेअर होल्डर कंपनी झाली आहे. एका एक्सचेंज फायलिंगमध्ये याबाबत माहिती देण्यात आली.
Indo-Asian News Service म्हणजेच IANS ही एक हिंदी आणि इंग्रजी न्यूज वायर सुविधा पुरवणारी कंपनी आहे. आता ही कंपनी AMNL म्हणजेच AMG Media Netwoks Limited या कंपनीची सब्सिडरी म्हणून कार्यरत राहील. अदानी ग्रुपने यापूर्वी अशाच प्रकारे NDTV देखील खरेदी केले होते. आता IANS आणि NDTV हे दोन्ही AMNL अंतर्गत येणार आहेत.
अदानींच्या कंपनीला IANS मध्ये व्होटिंग राईट्स देखील मिळाले आहेत. हे अधिग्रहण धोरणात्मक स्वरुपाचे असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे.
गौतम अदानी यांच्या समूहाने सुमारे वर्षभरापूर्वी NDTV मीडिया ग्रुपवर ताबा मिळवला होता. यानंतर चॅनलचे स्टार अँकर रवीश कुमार, तसंच संस्थापक प्रणव आणि राधिका रॉय यांनीही कंपनीला रामराम ठोकला होता. यानंतर एनडीटीव्हीची व्ह्यूअरशिप मोठ्या प्रमाणात घसरली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.