Ajanta Pharma ltd  Sakal
Personal Finance

Ajanta Pharma ltd : अजंता फार्मा लिमिटेड 2 मे रोजी घेणार शेअर बायबॅकबाबत निर्णय

सकाळ वृत्तसेवा

अजंता फार्मा लिमिटेड (Ajanta Pharma ltd) लवकरच शेअर बायबॅकबाबत निर्णय घेऊ शकते. कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 2 मे रोजी होणार आहे. या बैठकीत शेअर बायबॅकचा विचार केला जाईल. कंपनीने आपल्या एक्सचेंज फाइलिंगमध्ये नुकतीच ही माहिती दिली आहे. यानंतर अजंता फार्माच्या शेअर्समध्ये 2.83 टक्क्यांची वाढ झाली.

बीएसईवर हा शेअर 2200.70 रुपयांवर बंद झाला. या वाढीसह कंपनीचे मार्केट कॅप 27,710 कोटी झाले आहे. स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 2,355.05 रुपये आहे आणि 52 आठवड्यांचा नीचांक 1,240.55 रुपये आहे.

शेअर बायबॅकशिवाय अजंता फार्मा आगामी बैठकीत मार्च तिमाहीच्या निकालांचाही विचार करेल. हा चौथा बायबॅक आहे ज्यावर अजंता फार्मा निर्णय घेणार आहे. पहिला बायबॅक नोव्हेंबर 2020 मध्ये आणि दुसरा जानेवारी 2022 मध्ये झाला.

गेल्या वर्षी, बोर्डाने टेंडर ऑफर रूटद्वारे 315 कोटीचे शेअर्स 1425 रुपये प्रति शेअर या दराने विकत घेतले होते. बोर्डाने प्रत्येकी 2 रुपये फेस व्हॅल्यूचे 22.1 लाख इक्विटी शेअर्सची पुनर्खरेदी केली होती.

बायबॅकच्या घोषणेनंतर व्यवहाराच्या शेवटी अजंता फार्माच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली. गेल्या पाच दिवसांत कंपनीच्या शेअर्समध्ये 5 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. मात्र, गेल्या महिनाभरात त्याची कामगिरी सपाट आहे. गेल्या 6 महिन्यांत या स्टॉकमध्ये 25% वाढ दिसून आली. या कंपनीत प्रमोटर्सचे 66.22 टक्के शेअर्स आहेत.

याशिवाय विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार (FII) 8.54 टक्के शेअर्स आहेत. डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स (DII) कंपनीत 17.48 टक्के स्टेक आहेत. कंपनीत जनतेचा 7.76 टक्के हिस्सा आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT