Akasa gets nod to start international flights amid pilot exodus & firefighting  Sakal
Personal Finance

Akasa Air: बुडणाऱ्या 'आकासा'ला मोठा आधार! सरकारने घेतला मोठा निर्णय, आता होणार...

Akasa Air: आकासा विमानसेवा केवळ 13 महिन्यांपूर्वी मोठ्या थाटात सुरू करण्यात आली होती.

राहुल शेळके

Akasa Air: विमान वाहतूक उद्योग आर्थिक संकटाचा सामना करत आहे. आकासा एअर विमानसेवा बंद होण्याचा धोका असल्याचे सांगण्यात येत आहे. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे ही विमानसेवा केवळ 13 महिन्यांपूर्वी मोठ्या थाटात सुरू करण्यात आली होती. बाजारातील बिग बुल म्हणून ओळखले जाणारे दिवंगत राकेश झुनझुनवाला यांची गुंतवणूक असलेली ही कंपनी अवघ्या 13 महिन्यांतच ढासळली आहे.

कंपनीच्या 43 वैमानिकांनी अचानक राजीनामा दिला आहे. 43 वैमानिकांनी एकाच वेळी राजीनामा दिल्यामुळे कंपनीला दररोज 24 फ्लाइट रद्द कराव्या लागल्या आहेत. कंपनी बंद होण्याचा धोका असल्याची कबुली खुद्द कंपनीनेच दिली आहे. कंपनीने दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले की, अशा अचानक वैमानिकांच्या राजीनाम्यामुळे कंपनी बंद होण्याच्या मार्गावर आहे.

सध्या वैमानिकांच्या कमतरतेचा सामना करत असलेल्या आकासा एअरचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विनय दुबे यांनी बुधवारी सांगितले की नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने एअरलाइनला आंतरराष्ट्रीय ऑपरेटरचा दर्जा दिला आहे.

एव्हिएशन उद्योगात काम सुरू केल्यानंतर केवळ एका वर्षानंतर, आकासा एअरला नागरी उड्डाण मंत्रालयाकडून आंतरराष्ट्रीय उड्डाणे चालवण्याची परवानगी मिळाली आहे. कंपनी आता दक्षिण आशिया, दक्षिण-पूर्व आशिया आणि पश्चिम आशियातील देशांमध्ये विमान चालवण्याची योजना आखत आहे.

विनय दुबे यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, 'या नवीन परिस्थितीमुळे आम्हाला आंतरराष्ट्रीय उड्डाणे करता येतील. यासह, आम्ही या वर्षाच्या अखेरीस आमचे आंतरराष्ट्रीय ऑपरेशन सुरू करण्याचे आमचे स्वप्न पूर्ण करण्याच्या एक पाऊल जवळ आलो आहोत.

यासोबतच ते म्हणाले की, आता विमान कंपनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत परदेशी उड्डाण करण्याच्या योजनेवर काम करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्मृतिभ्रंशाचा आजार; आता ते आमचेच भाषण चोरत आहेत

Rajnath Singh : राहुल गांधी तुम्ही, आता जातगनणेची "ब्लु प्रिंट' जनतेसमोर आणाचं

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

SCROLL FOR NEXT