Akshaya Tritiya 2024 Planning to buy gold few things you need to keep in mind what expert says  Sakal
Personal Finance

Gold Investment: सोन्याचे भाव भिडले गगनाला.. अक्षय तृतीयेला सोने खरेदी करावी का? तज्ज्ञ काय सांगतात

Akshaya Tritiya 2024: अक्षय तृतीया 10 मे रोजी आहे. भारतात या निमित्ताने सोने खरेदी करण्याची परंपरा आहे. अनेक लोक या दिवसात सोने खरेदी करणे शुभ मानतात, परंतु आता अनेक लोक गुंतवणुकीच्या उद्देशाने सोन्यात पैसे गुंतवतात.

राहुल शेळके

Akshaya Tritiya 2024 Gold Investment: आज अक्षय तृतीया आहे. भारतात या निमित्ताने सोने खरेदी करण्याची परंपरा आहे. अनेक लोक या दिवसात सोने खरेदी करणे शुभ मानतात, परंतु आता अनेक लोक गुंतवणुकीच्या उद्देशाने सोन्यात पैसे गुंतवतात. सोने हा दीर्घ मुदतीत स्थिर परतावा देणारा पर्याय आहे, त्यामुळे गुंतवणूकदारांचा कल आता सोन्या-चांदीकडे वळत आहे. असं असलं तरी, सध्या भू-राजकीय तणावामुळे बाजारात अनिश्चितता आहे, ज्यामुळे सोन्याच्या भावात तेजीची अपेक्षा आहे.

सोने खरेदी करावी का?

एचडीएफसी सिक्युरिटीजचे कमोडिटी आणि करन्सी हेड अनुज गुप्ता यांनी सांगितले की, अलीकडे सोन्याचा भाव वाढला आहे. मात्र, विक्रमी उच्चांकावरून काही प्रमाणात नरमाई दिसून आली. ते म्हणाले, की जर आपण सध्याच्या काळात आपल्या पोर्टफोलिओमध्ये सोन्यासाठी 5 ते 8 टक्के वाटा ठेवणे शहाणपणाचे ठरेल.

सध्या ज्या प्रकारचे वातावरण तयार होत आहे, विशेषतः नवीन गुंतवणूकदारांना सोन्यात गुंतवणूक करण्याची संधी आहे. अमेरिकेतील आकडेवारी चांगली नाही, डॉलर निर्देशांकात घसरण वाढत आहे. हे सोन्यासाठी सकारात्मक आहे. त्याच वेळी, सेंट्रल बँक ऑफ चायनाने जानेवारी ते मार्च 2024 दरम्यान म्हणजेच 3 महिन्यांत 27 टन सोन्याची खरेदी केली आहे. आरबीआयसह इतर मध्यवर्ती बँका देखील सोन्याची सतत खरेदी करत आहेत, ज्यामुळे किंमतीला आधार मिळत आहे.

भूराजकीय तणाव अजूनही कायम असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. रशिया आणि युक्रेन आणि इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू आहे. शेअर बाजाराचे मूल्यांकनही वाढत आहे. अशा स्थितीत भविष्यातही सोन्यात तेजीची अपेक्षा आहे.

किती परतावा मिळू शकेल?

अनुज गुप्ता म्हणतात की आपण प्रत्येक घटकाकडे लक्ष दिल्यास या वर्षाच्या अखेरीस सोने MCX वर 75,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर पोहोचू शकतो. आज म्हणजेच 7 मे 2024 रोजी, MCX (Gold MCX) वर सोन्याचा भाव 71,300 रुपये प्रति 10 ग्रॅम दिसत आहे. मात्र, त्याच्या किमती विक्रमी उच्चांकावरून नरमल्या आहेत. गेल्या महिन्यात म्हणजेच एप्रिल 2024 मध्ये सोन्याने 73,958 रुपये प्रति 10 ग्रॅमचा विक्रमी उच्चांक गाठला होता.

सोन्यासाठी सकारात्मक घटक

● भू-राजकीय तणाव कायम आहे आणि तो आणखी वाढला तर सोन्यासाठी सकारात्मक होईल

● केंद्रीय बँकांकडून सोन्याला चांगली मागणी

● जागतिक स्तरावर सोन्याची मागणी

● भारतात सोन्याला चांगली मागणी आहे

● बाजार उच्च मूल्यांकनावर आहेत, सुधारण्याची शक्यता आहे

सोन्यासाठी नकारात्मक घटक

● डॉलर निर्देशांक स्थिर आहे

● यूएस ट्रेझरी बाँड उत्पन्न वाढले

● पश्चिम आशियातील तणाव कमी होण्याची अपेक्षा

● यूएस फेडने व्याजदर स्थिर ठेवले आहेत

● चांगला आर्थिक डेटा

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT