Akshaya Tritiya 2024 The gold market is booming Big turnover on the occasion of Akshaya Tritiya says Saraf traders  Sakal
Personal Finance

Akshaya Tritiya 2024: सोन्याच्या बाजारपेठेला झळाळी; अक्षय्य तृतीयेनिमित्त मोठी उलाढाल, सराफ व्यावसायिकांना विश्वास

Akshaya Tritiya 2024: गेल्या महिनाभरात सोन्याच्या भावात झालेली मोठी वाढ आणि त्यानंतर काहीशी घट झाल्यानंतरही अद्याप सराफ बाजारातील तेजी कायम आहे. त्यात अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने बाजारपेठेला आणखी झळाळी आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Akshaya Tritiya 2024: गेल्या महिनाभरात सोन्याच्या भावात झालेली मोठी वाढ आणि त्यानंतर काहीशी घट झाल्यानंतरही अद्याप सराफ बाजारातील तेजी कायम आहे. त्यात अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने बाजारपेठेला आणखी झळाळी आली आहे. त्यामुळे यंदाच्या अक्षय्य तृतीयेच्या निमित्तानेदेखील मोठी उलाढाल होणार असल्याचा विश्वास सराफ व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.

लग्नसराईचे निमित्त आणि अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने-चांदीचे दागिने घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. सोन्याच्या भावात बदल होत असल्याने अनेक ग्राहकांनी आधीच बुकिंग करून ठेवले आहे. गेल्या आठ दिवसांपासून दागिने घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यात लग्नाचे दागिने घेणाऱ्यांची संख्या जास्त आहे. गंठण, मंगळसूत्र, मिनी गंठण, बांगड्या, पाटल्या आणि अंगठ्या यांचा त्यात प्रामुख्याने समावेश आहे, तर गुंतवणुक म्हणून वेढणीला देखील मागणी आहे, अशी माहिती सराफ व्यावसायिकांनी दिली.

शुभ मुहूर्तावरील खरेदी आणि नागरिकांना आकर्षित करण्यासाठी सराफ व्यावसायिकांकडून देण्यात आलेल्या विविध ऑफरचा देखील खरेदीवर सकारात्मक परिमाण झाला आहे. सराफ व्यावसायिकांनी दिलेल्या ऑफरचा ग्राहकांनी फायदा घेतल्याचे चित्र सराफ बाजारात पाहायला मिळाले.

साडेअकरा हजारांनी वाढ

गेल्या वर्षीच्या अक्षय्य तृतीयेला २२ कॅरेट सोन्याचा प्रति दहा ग्रॅमचा भाव ५६ हजार ३५३ रुपये होता, तर २४ कॅरेट सोने ६० हजार ५५० रुपये प्रति १० ग्रॅम होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत २४ कॅरेट सोने ११ हजार ४६३ रुपयांनी, तर २२ कॅरेट सोने १० हजार ६६९ रुपयांनी वाढले आहे.

१ मार्च २०२४ पासूनचे सोन्या-चांदीचे भाव रुपयांत (सोने प्रति दहा ग्रॅम)

तारीख २४ कॅरेट २२ कॅरेट चांदी प्रतिकिलो

१ मार्च ६२,९७४ ५८,६०९ ७०,८००

१५ मार्च ६६,००४ ६१,४२९ ७४,६५०

३१ मार्च ६८,६८० ६३,९२० ७५,६००

१५ एप्रिल ७३,००३ ६७,९४३ ८३,९७०

३० एप्रिल ७२,२१५ ६७,२१० ८०,८००

९ मे ७२,०१३ ६७,०२२ ८२,८००

''गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे तयार दागिने घेण्याचे प्रमाण वाढले आहे. लग्नसराई हे त्यामागील प्रमुख कारण आहे. सोन्याचे भाव वाढले असले तरी गेल्या वर्षीप्रमाणे यंदादेखील खरेदी वाढली आहे. गुंतवणूक, शुभकार्य आणि दैनंदिन वापरासाठी खरेदी होत आहे. त्यामुळे यंदादेखील मोठी उलाढाल होईल, असा विश्वास आहे.''

- अतुल अष्टेकर, भागीदार, कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT