Foreign Currency sakal
Personal Finance

Foreign Currency : परकी चलनसाठ्याचा सार्वकालिक विक्रम

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : देशाच्या परकी चलनसाठ्याने ३१ मे रोजी संपलेल्या आठवड्यात ६५० अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडत नवा विक्रम नोंदवला आहे. परकी चलनसाठ्यात ३१ मे रोजी संपलेल्या आठवड्यात ४.८४ अब्ज डॉलरची भर पडली आणि तो ६५१.५ अब्ज डॉलरच्या आतापर्यंतच्या सार्वकालिक विक्रमी स्तरावर पोहोचला आहे.

गेल्या आठवड्यात देशाचा परकी चलनसाठा २.०३ अब्ज डॉलरने घसरून ६४६.७ अब्ज डॉलर झाला होता. रिझर्व्ह बँकेने ही आकडेवारी जाहीर केली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, ३१ मे रोजी संपलेल्या आठवड्यात परकी चलनसाठ्याचा सर्वांत मोठा घटक असलेल्या परकी चलन मालमत्तेत ५.१ अब्ज डॉलरने प्रचंड वाढ होऊन ती ५७२.६ अब्ज डॉलरवर पोहोचली. मात्र, या कालावधीत सोन्याचा साठा २१.२ कोटी डॉलरने कमी होऊन ५६.५ अब्ज डॉलर झाला.

स्पेशल ड्रॉइंग राइट्स १.७ कोटी डॉलरने कमी होऊन १८.१२ अब्ज डॉलरवर आले. याच कालावधीत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडील (आयएमएफ) राखीव निधी १० लाख डॉलरने वाढून ४.३३ अब्ज डॉलर झाला आहे. यापूर्वी १७ मे रोजी परकी चलनसाठ्याने ६४८.७ अब्ज डॉलर ही आतापर्यंतची सर्वोच्च पातळी नोंदवली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

Simran Sharma: अवघ्या १० मिनिटांत भारताला दोन पदकं; दृष्टिहीन सिमरनची २०० मीटर शर्यतीत सर्वोत्तम कामगिरीसह बाजी

Ravikant Tupkar Fasting : रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित ; शेतकरी महिलेच्या हस्ते सोडले उपोषण

X Down: भारतासह जगभरात तासभर ट्विटर पडलं होतं बंद! नेटकऱ्यांचा संताप अन् पुन्हा झालं सुरु

Rashmika Mandana at Beed: रश्मिका मंदाना बीडमध्ये! धनंजय मुंडेंनी आयोजित केलेल्या गणेशोत्सवाच्या कार्यक्रमाला लावली हजेरी

SCROLL FOR NEXT