Amazon CEO: जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनचे सीईओ अँडी जॅसी यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सावध केले आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, अॅमेझॉनच्या सीईओने सांगितले की, जे आठवड्यातून तीन दिवस ऑफिसमधून काम करत नाहीत त्यांना कामावरून काढून टाकण्यात येईल.
विशेष म्हणजे, मे 2023 मध्ये, कंपनीने कार्यालयातून काम सुरू केले आणि सर्व कर्मचाऱ्यांना आठवड्यातून किमान तीन दिवस कार्यालयातून काम करण्यास सांगितले. कंपनीने आदेश दिल्यानंतरही त्याचे पालन न करणारे अनेक कर्मचारी आहेत.
सीईओ अँडी जेसी यांचा कर्मचाऱ्यांना इशारा
ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार अशा कर्मचाऱ्यांवर कठोर भूमिका घेत सीईओ अँडी जेसी म्हणाले की, कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या या आदेशाचे योग्य पालन केले नाही तर भविष्यात त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात.
या महिन्यात झालेल्या बैठकीत सीईओंनी स्पष्ट केले की जर कर्मचारी कार्यालयातून त्यांच्या कामाचे टार्गेट पूर्ण करू शकले नाहीत तर त्यांना नोकरी गमवावी लागू शकते.
बऱ्याच काळापासून अनेक कर्मचारी घरून काम करत होते, परंतु आता कंपनीच्या कठोर धोरणानंतर त्यांना पुन्हा एकदा कार्यालयात यावे लागणार आहे.
कंपनीने 27,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले
जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी Amazon च्या कर्मचाऱ्यांसाठी 2023 हे वर्ष कठीण गेले आहे. जागतिक मंदीमुळे, कंपनीने आपला खर्च कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात (Amazon Layoffs 2023) केली आहे.
यावर्षी कंपनीने एकूण 27 हजार कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. यानंतर, नियम अधिक कठोर करत मे 2023 मध्ये कंपनीने आठवड्यातून तीन दिवस कार्यालयीन कामकाज करणे आवश्यक केले आहे.
अशा परिस्थितीत अमेरिकेतील सिएटलमध्ये कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी या आदेशाला मोठ्या प्रमाणावर विरोध केला होता. यानंतरही अॅमेझॉनने आपल्या निर्णयात कोणताही बदल केलेला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.