Amfi Mutual Fund investor awareness finance Sakal
Personal Finance

Amfi Mutual Fund : ‘ॲम्फी’ ‘म्युच्युअल फंड’चा कर्ताधर्ता

आपल्या देशामध्ये म्युच्युअल फंडाची संकल्पना वेगाने घरोघरी पसरत आहे.

सकाळ वृत्तसेवा

- सुधीर भगत

गुंतवणूक या विषयावर हल्ली बरेच कार्यक्रम सादर होतात. अशा कार्यक्रमांना आम्ही ज्या वेळेस गुंतवणूकदारांना मार्गदर्शन करतो, तेव्हा एक प्रश्न आवर्जून विचारतो आणि तो म्हणजे, तुमच्यापैकी किती जणांची म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक आहे किंवा ‘एसआयपी’ आहे? हा प्रश्न विचारल्यावर साधारण ४० टक्के हात वर होतात.

आपल्या देशामध्ये म्युच्युअल फंडाची संकल्पना वेगाने घरोघरी पसरत आहे. यासंबंधी महत्त्वाच्या वाहिन्यांवर काही मातब्बर सेलिब्रिटींना घेऊन म्युच्युअल फंड विषयाबद्दल जनजागृती चालू असते. म्युच्युअल फंड सही है!

हे ब्रीदवाक्य जनतेच्या पसंतीस आले आहे, हे नक्की. म्युच्युअल फंडाविषयी नखशिखान्त माहिती नेमकी कोणत्या ठिकाणी मिळेल? हे बहुतांशी गुंतवणूकदारांना माहित नाही. आज आपण ही माहिती कशी व कोठे मिळेल, ते समजून घेऊ.

म्युच्युअल फंडाविषयी संपूर्ण माहिती आणि सर्व शंकांचे निरसन करणारी एकमेव संस्था आहे आणि तिचे नाव आहे ‘ॲम्फी इंडिया’. ‘ॲम्फी’ (AMFI) म्हणजे असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया.

आपल्या देशामध्ये १० कोटींपेक्षा अधिक म्युच्युअल फंड फोलिओ आहेत. ‘एसआयपी’ची ८.७६ कोटी खाती आहेत. मे २०२४ मध्ये ‘एसआयपी’मार्फत गोळा केलेली एकूण रक्कम २०,९०४ कोटी होती. या सर्व गुंतवणूकदारांना ४४ म्युच्युअल फंड आणि त्यांचे १५ प्रमुख बोर्ड सदस्यांचा पाठिंबा असणाऱ्या ‘ॲम्फी’बाबत माहिती असणे गरजेचे आहे.

तीन प्रमुख पैलू

असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया ही देशातील सर्व म्युच्युअल फंडांच्या मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांची एक ना-नफा संस्था आहे, जी सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी)मध्ये नोंदणीकृत आहे.

‘ॲम्फी’चे पंधरा संचालकांचे एक महत्त्वपूर्ण मंडळ असते, जे व्यापक मार्गदर्शनाखाली कार्य करते. हे मंडळ म्युच्युअल फंडाच्या मालमत्ता व्यवस्थापन कंपन्याच्या विविध श्रेणींमधून निवडलेले तज्ज्ञ, विविध स्थायी समित्या व कार्यकारी गटांच्या मदतीने सहकारी तत्त्वावर कार्य करते.

‘ॲम्फी’ भारतीय म्युच्युअल फंड उद्योगाचा व्यावसायिक, निकोप व नैतिक धर्तीवर विकास करण्यासाठी आणि गुंतवणूकदारांच्या संपूर्ण हितासाठी सर्व क्षेत्रांमध्ये कार्य करण्यास समर्पित आहे.

तीन मुख्य उद्दिष्टे

  • म्युच्युअल फंड संकल्पनेची व कार्यपद्धतीची समज वाढवण्यासाठी देशव्यापी गुंतवणूकदार जागरूकता कार्यक्रम हाती घेणे.

  • आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल शिस्तभंगाच्या कारवाईसह (वितरकांची नोंदणी रद्द करणे) वितरकांच्या वर्तनाचे नियमन करणे व गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी तत्पर राहणे.

  • म्युच्युअल फंड उद्योगाशी संबंधित सर्व बाबींवर सरकार, भारतीय रिझर्व्ह बँक आणि इतर संस्थांचे प्रतिनिधित्व करणे.

संकेतस्थळावर सर्व माहिती

  • ‘ॲम्फी’च्या https://www.amfiindia.com या संकेतस्थळावर नव्या-जुन्या सर्व गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडांबद्दल सखोल माहिती मिळते.

  • म्युच्युअल फंडातील विविध पर्याय समजून घेण्यासाठी तपशीलवार; पण सोप्या भाषेमधील (राज्यभाषेमध्येसुद्धा) व्हिडिओ उपलब्ध आहेत.

  • सर्व म्युच्युअल फंडांच्या पर्यायांची माहिती, संशोधन, कार्यप्रदर्शन तपशील आणि निष्पक्ष मत उपलब्ध आहेत.

  • म्युच्युअल फंड गुंतवणुकीनंतर सेवा-सहकार्य मिळत नसेल, तर कोणाशी संपर्क साधावा? आपल्या परिसरात म्युच्युअल फंड वितरक कोण आहेत? ‘केवायसी’विषयी मार्गदर्शन अशा विविध बाबींची उपयुक्त माहिती उपलब्ध असते.

  • त्यामुळे सर्व गुंतवणूकदारांनी ‘ॲम्फी’च्या संकेतस्थळावर जाऊन माहितीचा जरूर लाभ घ्यावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT