Flipkart Big Billion Days Sale: बॉलीवूड स्टार अमिताभ बच्चन यांनी केलेल्या फ्लिपकार्टच्या जाहिरातीवर स्मार्टफोन किरकोळ विक्रेत्यांनी आक्षेप घेतला आहे. अमिताभ बच्चन यांच्यावर आरोप करण्यात आला आहे की, त्यांनी केलेली जाहीरात खरेदीदारांची दिशाभूल करणारी आहे. त्यामुळे फ्लिपकार्ट कंपनी अडचणीत आली आहे, असे वृत्त द इकॉनॉमिक टाइम्सने दिले आहे.
फ्लिपकार्टच्या 'द बिग बिलियन डेज' च्या हिंदी जाहिरातीत अमिताभ बच्चन असे म्हणतात की, फ्लिपकार्ट ज्या प्रकारचे मोबाइल डील ऑफर करत आहे ते किरकोळ विक्रेत्यांकडे मिळणार नाही.
ऑल इंडिया मोबाइल रिटेलर्स असोसिएशनने अमिताभ बच्चन यांना पत्र लिहिले आहे. त्या पत्रात म्हणटले की, विविध ऑनलाइन प्लॅटफॉर्म, सोशल मीडिया आणि प्रिंट मीडियावरील जाहिरातींबद्दल आम्ही तीव्र नाराजी व्यक्त करत आहोत.
या जाहिराती खोट्या आणि चुकीचा दावा करत आहेत आणि ग्राहकांच्या खरेदी वर्तनावर परिणाम करत आहेत. या जाहिरातींमध्ये दिशाभूल करणारी विधाने आहेत, अमिताभ बच्चन म्हणतात की ही वस्तू किरकोळ विक्रेत्यांकडे दुकानामध्ये मिळणार नाही.
यापूर्वी, कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) ने देखील बच्चन यांना पत्र लिहून म्हटले आहे की फ्लिपकार्टसाठी त्यांनी केलेली जाहिरात चुकीची माहिती पसरवत आहे आणि स्थानिक व्यवसायांना त्रास देत आहे.
दरम्यान, फ्लिपकार्टने ही जाहिरात आता यूट्यूबवरुन हटवली आहे. सणासुदीचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच, ई-कॉमर्स कंपनी Amazon आणि Flipkart ने त्यांच्या वर्षातील सर्वात मोठ्या सेलची तारीख जाहीर केली आहे.
फ्लिपकार्टवर बिग बिलियन डेज सेल 8 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे आणि तो 15 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. अॅमेझॉनने त्यांच्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलची तारीख 8 ऑक्टोबर आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.