Anand Mahindra post on RCB and Virat Kohli's ‘never give up attitude Know Details  Sakal
Personal Finance

Anand Mahindra: आरसीबी प्लेऑफमध्ये गेल्याने आनंद महिंद्राही खूश; पोस्ट करत म्हणाले, 'किंग कोहली आणि...'

सकाळ वृत्तसेवा

IPL 2024 Playoffs RCB: महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी सोमवारी एक्सवर (X) एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी किंग कोहली, तसेच आरसीबी संघाचे कौतुक केले आहे. आनंद महिंद्रा आपल्या एक्स (X) वर वारंवार पोस्ट करत असतात. आज त्यांनी Monday Motivation हॅशटॅग करत ही पोस्ट शेअर केली आहे.

नुकताच चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघात एक सामना झाला त्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स संघाने दणदणीत विजयी मिळवला होता. त्यानंतर आनंद महिंद्रा यांनी ही पोस्ट केली आहे.

त्या पोस्टमध्ये आनंद महिंद्रा यांनी लिहिले की 'महिंद्रा ग्रुपमध्ये आम्ही अशा लोकांवर विश्वास ठेवतो जे अडखळतात वारंवार पडतात पण कधीही हार मानत नाही. आणि अशाच लोकांचे आम्ही कौतुक करतो.' पोस्टमध्ये त्यांनी आरसीबी संघाचा कर्णधार विराट कोहली आणि आरसीबी संघाचं कौतुक केलं आहे”.

आम्हाला #Monday Motivation देण्यासाठी किंग कोहली आणि आरसीबीशिवाय दुसरे कोण असणार? असे लिहिले आहे. त्यांची पोस्ट जवळपास 80 लाखांपेक्षा अधिक लोकांनी पाहिली आहे. तसेच त्यावर 2.6 लाखांपेक्षा अधिक लाईक्स आल्या आहेत.

आरसीबी संघाने इंडियन प्रीमीयर लिगमध्ये सुरुवातीला अनेक सामने गमावले होते. त्यानंतर संघातील खेळाडूंनी सातत्य ठेवत पुढील सगळे सामने जिंकले. त्यांचा नुकताच चेन्नई सुंपर किग्ज बरोबर झालेला सामना अतिशय रोमांचक झाला होता.

चेन्नईच्या विरुद्ध सामना जिंकून आरसीबीने 2024च्या प्लेऑफमध्ये मध्ये प्रवेश केला आहे. आरसीबी आता 2024ची फायनल जिंकणार का? याकडे सर्वच क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागले आहे. आनंद महिंद्रा यांनी आरसीबीचे कौतुक केल्याने त्यांच्या पोस्टची आरसीबी फॅनमध्ये चांगलीच चर्चा सुरु आहे.

(स्टोरी- मनोज साळवे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT