Apple Awas Yojana: गेल्या दोन ते तीन वर्षांत देशभरात दीड लाख लोकांना रोजगार दिल्यानंतर ॲपल भारतात चीन आणि व्हिएतनामसारखे औद्योगिक गृहनिर्माण मॉडेल स्वीकारण्याचा विचार करत आहे. या मॉडेलनुसार कंपनी कारखान्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना घरांची सुविधा देणार आहे.
इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार, फॉक्सकॉन, टाटा आणि सालकॉम्पसह Apple चे इतर उत्पादक आणि पुरवठादार त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी घरे बांधण्याची योजना आखत आहेत.
अहवालानुसार, ही घरे सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) मॉडेल अंतर्गत बांधली जातील. योजनेअंतर्गत 78,000 पेक्षा जास्त घरे बांधण्यात येणार आहेत. यापैकी जास्तीत जास्त 58,000 घरे तामिळनाडूमध्ये तयार होतील.
तामिळनाडू स्टेट इंडस्ट्रीज प्रमोशन कॉर्पोरेशन (SIPCOT) द्वारे बहुतेक घरे बांधली जात आहेत. टाटा समूह आणि एसपीआर इंडियाही घरे बांधत आहेत.
योजनेचा एक भाग म्हणून, केंद्र सरकार 10-15 टक्के निधी देईल तर उर्वरित निधी राज्य सरकार आणि व्यवसायांकडून येईल. 31 मार्च 2025 पर्यंत बांधकाम पूर्ण होईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, "कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता सुधारणे आणि मुख्यतः स्थलांतरित महिला कर्मचाऱ्यांना सुरक्षा देणे हा या योजने मागचा उद्देश आहे. यातील बहुतांश कर्मचारी हे 19-24 वयोगटातील आहेत.”
अधिका-यांनी सांगितले की, कर्मचाऱ्यांसाठी, विशेषत: महिला कर्मचाऱ्यांसाठी एवढा मोठा गृहनिर्माण प्रकल्प भारतातील पहिलाच आहे. ते म्हणाले की बहुतेक कामगार भाड्याच्या घरात राहतात आणि कारखान्यात जाण्यासाठी बसमधून तासभर प्रवास करतात. अनेक कर्मचारी महिला आहेत, ज्यामुळे सुरक्षेशी संबंधित समस्या देखील निर्माण होतात.
फॉक्सकॉन, ॲपलची भारतातील सर्वात मोठी आयफोन पुरवठादार कंपनी आहे, फॉक्सकॉनला 35 हजार घरे मिळणार आहेत. फॉक्सकॉनमध्ये सध्या 41,000 कर्मचारी काम करत आहेत, त्यापैकी 75 टक्के महिला आहेत. त्यांचे कार्यालय तामिळनाडूच्या श्रीपेरुंबदुर येथे आहे. टाटा इलेक्ट्रॉनिक्स आपल्या होसूर कारखान्यात कर्मचाऱ्यांसाठी 11,500 घरे तयार करत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.