Apple shares at a record high what are the reasons for the increase in the target price sakal
Personal Finance

ऍपलचे शेअर विक्रमी उच्चांकावर, टारगेट प्राइसमध्ये वाढीची कारणे काय ?

सकाळ वृत्तसेवा

आयफोन उत्पादक कंपनी ऍपलच्या (Apple) शेअर्सने नुकताच विक्रमी उच्चांक गाठला. ब्रोकरेज मॉर्गन स्टॅनली आपल्या टॉप पिक्समध्ये ऍपलच्या शेअर्सचा समावेश केल्यानंतर शेअर्समध्ये ही वाढ दिसून आली.आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) संदर्भात ऍपल करत असलेल्या प्रयत्नांमुळे त्यांच्या उपकरणांची विक्री वाढू शकते असे ब्रोकरेजचे म्हणणे आहे.

ब्रोकरेजने आपली टार्गेट किंमतही वाढवली. अल्फाबेटच्या गुगल आणि मायक्रोसॉफ्टच्या ओपनएआयशी स्पर्धा करण्यासाठी ॲपलने गेल्या महिन्यात ॲपल इंटेलिजेंस सादर केले. नवीन तंत्रज्ञान वापरण्यासाठी ग्राहकांना त्यांचे उपकरण अपग्रेड करण्यासाठी प्रोत्साहित केले जाऊ शकते.

ॲपल इंटेलिजन्समुळे आयफोन आणि आयपॅडच्या विक्रीत मोठी वाढ होऊ शकते असे मॉर्गन स्टॅनले विश्लेषकांचे म्हणणे आहे. सध्या वापरात असलेल्या iPhones आणि iPads पैकी फक्त 8 टक्के नवीन तंत्रज्ञानाने सुसज्ज आहेत.

सध्या, 130 कोटी स्मार्टफोन वापरले जात आहेत आणि मॉर्गन स्टॅनले म्हणतात की ते दोन वर्षांत सुमारे 50 कोटी आयफोन विकू शकतात. याआधी, ब्रोकरेजने अंदाज व्यक्त केला होता की कंपनी पुढील दोन वर्षांत दरवर्षी 23 कोटी आणि 23.5 कोटी आयफोन विकू शकते. Apple ने जून 2024 च्या तिमाहीत जगभरात 4. 52 कोटी स्मार्टफोन विकले, तर जून 2023 च्या तिमाहीत हा आकडा 4.45 कोटी होता.

ऍपलचे शेअर्स यावर्षी जवळपास 20 टक्क्यांनी वाढून 236.30 डॉलरवर पोहोचले. तिचे मार्केट कॅप 3.62 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचले आहे आणि ती जगभरातील सर्वाधिक मार्केट कॅप असलेली कंपनी आहे. ब्रोकरेज विश्लेषक मॉर्गन स्टॅनलीबद्दल सध्या या शेअर्सबाबत अतिशय सकारात्मक आहेत आणि त्यामुळेच त्यांनी याची टारगेट किंमत 216 डॉलरवरून 273 डॉलरपर्यंत वाढवली आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT