Apple to shut down its AI team, 121 employees asked to relocate or face job loss  Sakal
Personal Finance

Apple: ॲपलने थांबवले AI टीमचे काम, 121 कर्मचार्‍यांच्या नोकऱ्यांवर येणार गदा

Apple: ॲपलने Siri साठी काम करणारी AI टीम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या टीममध्ये सध्या 121 कर्मचारी काम करत आहेत. AI टीम बंद करण्याच्या निर्णयानंतर अॅपलने कर्मचाऱ्यांना ऑस्टिनला जाण्याचा पर्याय दिला आहे.

राहुल शेळके

Apple: नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच टेक कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या नोकऱ्या धोक्यात आहेत. आयटी क्षेत्रातील अनेक कंपन्या कर्मचारी कपातीच्या तयारीत आहेत. काही काळापूर्वी गुगलने कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकर असल्याचे सांगितले होते.

यातच आता ॲपलने Siri साठी काम करणारी AI टीम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या टीममध्ये सध्या 121 कर्मचारी काम करत आहेत. AI टीम बंद करण्याच्या निर्णयानंतर अॅपलने कर्मचाऱ्यांना ऑस्टिनला जाण्याचा पर्याय दिला आहे.

कर्मचाऱ्यांनी तसे करण्यास नकार दिल्यास कंपनी त्यांना कामावरून काढून टाकेल. यासाठी कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी 2024 पर्यंत मुदत देण्यात आली आहे.

स्थलांतरास नकार देणाऱ्यांना 26 एप्रिलनंतर कंपनीतून बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. अमेरिकेशिवाय या एआय टीमची कार्यालये भारत, चीन, स्पेन, आयर्लंडमध्येही आहेत.

ऑस्टिनमध्ये या टीमसाठी अनेक लोक आधीच काम करत आहेत. त्यामुळे आगामी काळात अॅपल अनेक कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवू शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे.

कंपनीच्या या निर्णयामुळे आगामी काळात अनेक कर्मचारी कंपनी सोडून जाण्याची भीती आहे. सप्टेंबर 2023 पर्यंत Apple मध्ये काम करणाऱ्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 1,61,000 होती. कंपनीने असा दावा केला की प्रतिकूल परिस्थिती असूनही त्यांनी फारच कमी कर्मचारी कपात केली आहे.

गुगलनेही कर्मचारी कपातीची योजना बनवली आहे. गुगल असिस्टंट आणि कोअर इंजिनीअरिंग आणि हार्डवेअरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या टीमला कंपनी काढून टाकण्याच्या तयारीत आहे. इतर अनेक टेक कंपन्यांना कोरोना दरम्यान कर्मचारी कपातीचा सामना करावा लागला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel PM Netanyahu: इस्रायली पंतप्रधानांच्या घरावर बॉम्ब हल्ला; संरक्षण मंत्री म्हणाले, आता हद्द झाली...

Latest Maharashtra News Updates : राजनाथ सिंह यांनी हायपरसॉनिक क्षेपणास्त्राच्या यशस्वी उड्डाण चाचणीबद्दल सशस्त्र दल आणि उद्योगाचे अभिनंदन केले

Uric Acid Home Remedies: युरिक अ‍ॅसिडची समस्या असल्यास सकाळी रिकाम्यापोटी 'ही' गोष्ट पाण्यात उकळून प्यावी, मिळेल आराम

Hasan Mushrif : 'ED प्रकरणात कोर्टानं मला क्लीन चिट दिलीये, शरद पवारांना याची माहिती नाही'; काय म्हणाले मुश्रीफ?

Navneet Rana: मोठी बातमी! नवनीत राणांच्या प्रचारसभेत राडा, अंगावार खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT