Personal Finance

Mhada: म्हाडाच्या कोंकण मंडळाच्या घरांसाठी अर्ज भण्यास सुरुवात

Kokan News: उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते सोडतीचा ‘गो-लाइव्ह’ समारंभ

सकाळ वृत्तसेवा

Mumbai : म्हाडाच्या कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे शहर व जिल्हा, कल्याण, टिटवाळा, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील ओरस आणि वेंगुर्ला आणि मालवण येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत असलेल्या सुमारे १२ हजार ६२६ सदनिकांच्या विक्रीकरिता अर्ज भरण्यास शुक्रवारी दुपारपासून सुरुवात झाली. या ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेचा शुभारंभ ‘गो-लाइव्ह’ कार्यक्रमांतर्गत म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आला.



मुंबईतील पार पाडलेल्या सोडतीनंतर शुक्रवारी (ता. ११) म्हाडाच्या कोंकण मंडळातर्फे सदनिकांची सोडत जाहीर करण्यात आली आहे. ठाणे, कल्याण, नवी मुंबई आणि विरार या शहरांमध्ये परवडणाऱ्या दरातील सदनिकांचा या सोडतीत प्रामुख्याने समावेश आहे. समाजातील शेवटच्या घटकाला हक्काचा निवारा मिळावा, या उद्दिष्टांवर कार्यरत म्हाडाने कोंकण मंडळाच्या सोडतीच्या माध्यमातून ही घरे उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे संजीव जयस्वाल यांनी या वेळी सांगितले.

या वेळी मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर, म्हाडाचे मुख्य अभियंता धिरजकुमार पंदिरकर, महेशकुमार जेस्वानी, शिवकुमार आडे, वित्त नियंत्रक अजयसिंह पवार, मुख्य वास्तुशास्त्रज्ञ व नियोजनकार प्रवीण साळुंखे, मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली गडपाले, विधी सल्लागार मृदुला परब, मुख्य माहिती व संचार तंत्रज्ञान अधिकारी सविता बोडके, उपमुख्य अधिकारी कल्पना पवार आदी उपस्थित होते.

‘अधिकृत संकेतस्थळाची पडताळणी करावी’


म्हाडाच्या कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या सोडत प्रक्रियेत म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in व https://lottery.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरूनच अर्ज नोंदणी, अर्ज भरणा करून सहभाग नोंदवता येईल. सोडत प्रक्रियेत सहभाग घेतेवेळी म्हाडाचे संकेतस्थळ अधिकृत असल्याची पडताळणी करूनच अर्ज नोंदणी करावी. तसेच अनामत रकमेव्यतिरिक्त सदनिकेची कोणतीही रक्कम म्हाडातर्फे आगाऊ घेतली जात नाही; या बाबीची सर्वांनी दखल घ्यावी, असेही संजीव जयस्वाल यांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT